शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
3
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
4
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
5
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
6
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
7
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
8
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
9
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
10
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
11
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
12
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
13
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
14
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
15
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
16
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
17
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
18
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
19
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
20
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
Daily Top 2Weekly Top 5

उत्तनचे डम्पिंग ग्राउंड अन्यत्र हलवा

By admin | Updated: March 5, 2016 01:26 IST

शहरातील कचरा उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यास येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. अन्यत्र पर्याय शोधण्याची सूचना ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुरुवारच्या प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केली.

भार्इंदर : शहरातील कचरा उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यास येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. अन्यत्र पर्याय शोधण्याची सूचना ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुरुवारच्या प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केली.
शिष्टमंडळात नगरसेवक बर्नड डिमेलो, नगरसेविका शर्मिला बगाजी, हेलन जॉर्जी, लिओ कोलासो, रेनॉल्ड बेचरी, विल्यम गोविंद जॉर्जी, अ‍ॅलन बोर्जीस यांचा समावेश होता. पालिकेने २००८ मध्ये उत्तनच्या धावगी-डोंगरी येथे बीओटी तत्त्वावर कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. त्या वेळी स्थानिकांनी विरोध केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने तेथील धर्मगुरूंसह स्थानिक नेत्यांनी हा प्रकल्प लवकरच अन्यत्र स्थलांतर करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. परंतु, हा प्रकल्प आजही तेथेच सुरू आहे. तेथील प्रकल्प बंद पडल्याने कचरा उघड्यावर टाकला जात आहे. दरम्यानच्या काळात तो वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतरित करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केल्यानंतर ती जागा वन विभागांतर्गत असल्याने वन विभागाने अद्याप परवानगी दिलेली नाही. तसेच या प्रकल्पास सकवार ग्रामस्थांनीही विरोध केल्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाल्याने पालिकेने एमएमआरडीएमार्फत तळोजा येथे प्रस्तावित असलेल्या प्रकल्पात समाविष्ट होण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उत्तन येथील डम्पिंग ग्राउंड सुरूच राहिल्याने त्याच्या स्थलांतरासाठी ग्रामस्थांनी नागरी हक्क समितीच्या माध्यमातून १० वर्षांपासून पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यावर प्रशासनाकडून प्रकल्प स्थलांतराचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगून स्थानिकांचा विरोध थोपवला जात आहे. त्यातच, सकवार येथील नियोजित प्रकल्पही वन विभागाच्या लालफितीत अडकल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकल्पाचा अभ्यास करणाऱ्या आयआयटीच्या अहवालानुसार कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सूचना पालिकेला केली आहे. डम्पिंग ग्राउंडच स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी उत्तनच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अच्युत हांगे यांची भेट घेत शहरातील कचरा उत्तन येथे टाकण्यास विरोध दर्शविला. नागरिकांचा विरोध शमवण्यासाठी प्रशासनाने येत्या दोन महिन्यांत येथील कचऱ्यावर प्रभावी प्रक्रिया केली जाणार आहे. (प्रतिनिधी)