शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
5
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
6
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
7
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
9
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
10
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
11
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
12
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
13
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
14
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
15
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
16
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
17
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
18
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
19
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
20
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

Confirm! राज ठाकरेंच्या ठाण्यातील 'उत्तर' सभेची तारीख बदलली; नवा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 20:37 IST

९ तारखेची सभा रद्द; आता 'या' दिवशी होणार 'उत्तर सभा'

येत्या ९ एप्रिल रोजी ठाण्यात मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीला मूस रोड, त्यानंतर पोलिसांनी परवानगी नाकारल्याने गजानन महाराज चौक हा रस्ता अंतिम करण्यात आला होता. मात्र आता या सभेचे ठिकाण आणि तारीखही बदलण्यात आली आहे. आता गडकरी गडकरी रंगायतन येथील दुसरा रस्त्यावर अर्थात चिंतामणी चौक ते दगडी शाळा या परिसरात ही सभा होणार असल्याची माहिती मनसेचे नेते अभिजीत पानसे, समीर देशपांडे, आमदार राजू पाटील आणि अविनाश जाधव यांनी दिली असून सभेची तारीख मात्र बदलण्यात आले आहे. आता ही सभा नव्या तारखेप्रमाणे १२ एप्रिल रोजी होणार आहे.

गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला होता. दरम्यान याच दिवशी हिंदीभाषा एकता परिषद आणि राजस्थानी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ७.३० वाजता गडकरी रंगायतनमध्ये २८ व्या राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला  पालकमंत्नी एकनाथ शिंदे, गृह निर्माण विभागाचे पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्यासह आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत.

शिवाय शहरात सध्या सर्वत्र चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत आहे. ९ एप्रिल ला अष्टमी असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन आम्ही पोलिसांनी केलेल्या विनंतीला मान देत ही सभा ९ एप्रिल ऐवजी १२ एप्रिल रोजी घेण्याचे निश्चित केले असल्याची माहिती अभिजीत पानसे यांनी दिली. तर पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली हे काम केले याची माहिती आम्हाला असल्याचा दावा समीर देशपांडे यांनी केला मात्र आता १२ एप्रिल या सर्वांची उत्तरे दिली जातील असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.नव्या ठिकाणी होणार सभागजानन महाराज चौक रस्ता सभेसाठी गुरुवारी दुपारी अंतिम करण्यात आला. मात्र त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत पोलिसांकडून स्पष्टता झाली नाही. त्यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाण्यात धाव घेऊन दोन्ही जागांची चाचपणी केली. अखेर पोलिसांच्या विनंतीला मान देत मनसेने ९ एप्रिलची सभा १२ एप्रिल रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आता ही सभा गडकरी रंगायतनच्या दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर म्हणजेच चिंतामणी चौक ते दगडी शाळा येथे घेण्याचे निश्चित केले आहे. ही सभा सायंकाळी सहा वाजता सुरू होईल असेही यावेळी अविनाश जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेthaneठाणे