आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्या हरीश दरोडा यांचा तुरुंगात मृत्यू, कोणत्या प्रकरणात होते अटकेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 17:50 IST2026-01-23T17:44:31+5:302026-01-23T17:50:17+5:30

शहारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्याचा तुरुंगात मृत्यू झाला. एका घोटाळ्यात हरीश दरोडा यांना अटक झाली होती. 

MLA Daulat Daroda's nephew Harish Daroda died in jail, in which case was he arrested? | आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्या हरीश दरोडा यांचा तुरुंगात मृत्यू, कोणत्या प्रकरणात होते अटकेत?

आमदार दौलत दरोडा यांच्या पुतण्या हरीश दरोडा यांचा तुरुंगात मृत्यू, कोणत्या प्रकरणात होते अटकेत?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांचा पुतण्या हरीश दरोडा यांचा तुरुंगात मृत्यू झाला. भात खरेदी घोटाळ्याच्या प्रकरणात त्यांच्यावर आरोप होते. न्यायालयीन कोठडीत असताना हरीश दरोडा यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता.

शहापूर तालुक्यातील साकडबाव केंद्रात दीड कोटी रुपयांच्या भात खरेदीत घोटाळा झाला. या प्रकरणात हरीश दरोडा हे मुख्य आरोपी होते. 

दोन वर्ष फरार, अजित पवारांच्या पक्षात प्रवेश

५ हजार क्विंटल भात खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्या प्रकरणी डिसेंबर २०२३ मध्ये किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या त्यानंतर हरीश दरोडा हे अटकेपासून वाचण्यासाठी पोलिसांना गुंगारा देत होते. 

२ वर्षे फरार असलेल्या हरीश दरोडा यांना शहापूर पोलिसांनी शहापूरमधूनच अटक केली होती. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक शाखेने अटक केली होती. पण, अटक होण्याआधी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश झाला होता. 

ह्रदविकाराचा झटका अन् रुग्णालयात मृत्यू 

मिळालेल्या माहितीनुसार, हरीश दरोडा यांना कोठडीत असताना ह्रदयविकाराचा झटका आला. त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

 

Web Title : विधायक दरोडा के भतीजे हरीश दरोडा की जेल में मौत: गिरफ्तारी विवरण

Web Summary : विधायक दौलत दरोडा के भतीजे हरीश दरोडा की हिरासत में दिल का दौरा पड़ने से मौत हो गई। उन्हें चावल खरीद घोटाले के सिलसिले में गिरफ्तार किया गया था जिसमें धन का दुरुपयोग शामिल था। दरोडा अपनी गिरफ्तारी से पहले दो साल से फरार था।

Web Title : MLA Daroda's Nephew, Harish Daroda, Dies in Jail: Arrest Details

Web Summary : Harish Daroda, nephew of MLA Daulat Daroda, died in custody after a heart attack. He was arrested in connection with a rice procurement scam involving misappropriation of funds. Daroda had been on the run for two years before his arrest.