शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमची लढत आघाडीशीच!

By admin | Updated: October 27, 2015 00:15 IST

राज्यात दोन आमदार आणि औरंगाबाद महापालिकेत मिळालेल्या यशानंतर आॅल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलीमीन (एमआयएम) ही केडीएमसी निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे

प्रशांत माने, कल्याण राज्यात दोन आमदार आणि औरंगाबाद महापालिकेत मिळालेल्या यशानंतर आॅल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलीमीन (एमआयएम) ही केडीएमसी निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे. त्यांनी कल्याण पश्चिम आणि पूर्वेकडील मुस्लिमबहुल प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत. साधारणत: पारंपरिक मुस्लिम मतदान हे काँग्रेस तसेच राष्ट्रवादीला होत असल्याचा अनुभव असताना यंदा मात्र हे चित्र पालटण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर एमआयएम आणि आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता पाहता होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ कोणाला, हे पाहणेदेखील औत्सुक्याचे आहे.कल्याणमध्ये पावणेदोन ते दोन लाखांच्या आसपास मुस्लिम समाज आहे. येथील दूधनाका, रेतीबंदर, गांधी चौक, आनंदवाडी, बैलबाजार, सिंधीगेट, अशोकनगर, नेतिवली टेकडी, आंबेडकर रोड, मच्छी बाजार, बोंबिल बाजार, घासबाजार, वल्लीपीर रोड, गोविंदवाडी, कोळीवाडा, कचोरे, अन्सारी चौक या परिसरात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. दरम्यान, पहिल्यांदाच केडीएमसीची निवडणूक लढविणाऱ्या एमआयएमने गोविंदवाडी, रोहिदासवाडा, गफुरडोन चौक, कचोरे, नेतिवली टेकडी, अशोकनगर वालधुनी आणि बैलबाजार अशा सात ठिकाणी आपले उमेदवार दिले आहेत. सहा ठिकाणी मुस्लिम उमेदवार दिले असताना अशोकनगर वालधुनी प्रभागात अन्य समाजाच्या उमेदवाराला प्राधान्य दिले आहे. गतवेळचा आढावा घेता मुस्लिमबहुल प्रभागात उभ्या राहिलेल्या उमेदवारांपैकी काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच अपक्षांना मुस्लिम मतदारांनी पसंती दिली होती. यंदा एमआयएम रिंगणात उतरली आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करून लढत आहे. अन्य पक्षांचे उमेदवार जरी आखाड्यात असले तरी थेट लढत एमआयएम आणि आघाडीत होणार आहे. मुस्लिम पारंपरिक आघाडीला साथ करतात की एमआयएमचा पर्याय स्वीकारतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.