मराठा समाजाची सीमोल्लंघन फेरी जोशात

By Admin | Updated: October 12, 2016 04:14 IST2016-10-12T04:14:18+5:302016-10-12T04:14:18+5:30

ठाण्यात रविवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी डोंबिवलीत मंगळवारी दसऱ्याला मराठा समाजातर्फे सीमोल्लंघन फेरी

Maratha Samajchi's Seamolhanhan Ferry Joshath | मराठा समाजाची सीमोल्लंघन फेरी जोशात

मराठा समाजाची सीमोल्लंघन फेरी जोशात

कल्याण : ठाण्यात रविवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर वातावरण निर्मितीसाठी डोंबिवलीत मंगळवारी दसऱ्याला मराठा समाजातर्फे सीमोल्लंघन फेरी काढण्यात आली. त्यात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आरक्षणासह अन्य मागण्यांसदर्भात मराठा समाजाच्या इतरत्र निघालेल्या मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. त्यात रविवारी ठाणे जिल्ह्याचा मराठा समाजाचा मूक मोर्चा निघणार आहे. त्यात ठाणे, पालघर आणि नवी मुंबई परिसातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने ठाणे हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यामुळे या मोर्चाच्या गर्दीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हा मोर्चा शिस्तबद्ध आणि शांततेत व्हावा, त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी डोंबिवलीत नुकतीच बैठक झाली.
दरम्यान, या मोर्चाबाबत जागृती आणि वातावरण निर्मिती म्हणून मराठा समाजातर्फे मंगळवारी सीमोल्लंघन फेरी काढण्यात आली. यावेळी मराठा भगिनींनी छत्रपतींच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण केला. मराठा बांधव दुचाकींसह पारंपारिक वेशात सहभागी झाल्या होते. (प्रतिनिधी)

Web Title: Maratha Samajchi's Seamolhanhan Ferry Joshath