शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: विधानसभा निवडणूक ठरणार मनसेची परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 00:03 IST

२४ मतदारसंघांतील समस्यांचा अभ्यास सुरू; ठाणे-पालघरमध्ये राज ठाकरेंच्या सभा

- अजित मांडके 

ठाणे : लोकसभा निवडणुकीतून माघार घेणाऱ्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, राज्यात १०० ठिकाणी मनसेकडून उमेदवार दिले जाणार आहेत. त्यातील २४ उमेदवार हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील असणार आहेत. यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये त्यानिमित्ताने का होईना जोश निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे यानिमित्ताने पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदींसह पालघरमध्ये सभा होणार आहेत. यामध्ये ते भाजपविरोधात पुन्हा डरकाळी फोडणार आहेत. याशिवाय, विधानसभेच्या या कठीण परीक्षेत किती टक्के मिळणार, याचाही अभ्यास मनसे यानिमित्ताने करणार आहे.

लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढता केवळ लाव रे तो व्हिडीओमुळे राज यांची चांगलीच चर्चा झाली होती. परंतु, त्यानंतर विधानसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबतही अनेक तर्कवितर्क लावले जात होते. परंतु, अखेरच्या क्षणी मनसेने १०० जागा लढविण्याचे जाहीर केले. ठाणे आणि पालघरमधील सर्वच जागांवर म्हणजेच २४ जागांवर उमेदवार देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. त्यासाठी प्रचाराचाही अजेंडा जवळजवळ निश्चित झाला आहे. यामध्ये रस्ते, वीज, पाणी आदींसह मूलभूत सोयीसुविधांची वानवा याची पोलखोल केली जाणार आहे. ठाण्यातील चार मतदारसंघांतूनही अशाच प्रकारे प्रचार केला जाणार असून मनसे सत्तेत आल्यास विकासाची हमीही दिली जाणार आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि पालघर आदी भागांत राज ठाकरे यांची डरकाळी फुटणार असून मोदींची पोलखोल हा कार्यक्रम यानिमित्ताने प्रमुख अजेंडा असणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली.
या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेला मानणारा किंबहुना मराठी मतांचा टक्का किती मनसेला साथ देणार, याचाही अभ्यास या निवडणुकीत होणार आहे.

लोकसभा निवडणूक न लढल्यामुळे मनसेला कुठे, किती मते मिळू शकतात, मनसेच्या मतांचा फटका कोणाला बसणार, हे चित्र स्पष्ट होऊ शकले नव्हते. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत या सर्वांचीच उत्तरे किंबहुना किती टक्के मते मिळणार, हे स्वत: मनसे आणि इतर पक्षांना समजणार आहे. याच निवडणुकीत मिळविलेल्या मतांच्या जोरावर मनसेचा महापालिकेचा फॉर्म्युलाही निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.

पालघर नगर परिषदेत मनसेचा उमेदवारच नाही
ठाणे जिल्ह्यापेक्षाही पालघर जिल्ह्यात मनसेची स्थिती अवघड आहे. मागील काही वर्षांत मनसेचा या पट्ट्यात तसा कुठेच प्रभाव दिसून आलेला नाही. पालघर नगर परिषदेत तर मनसेला उमेदवारसुद्धा मिळाले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली होती. जिल्हा परिषद असो किंवा पंचायत समिती, येथेही मनसेचे इंजीन थांबलेलेच म्हणजे त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. मागील दीड वर्षापूर्वी मात्र जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर काही आंदोलनाच्या माध्यमातून मनसे येथे आहे, हे थोड्या अंशी चित्रित झाले. एकूणच ठाण्यापेक्षाही पालघरची परीक्षा मनसेसाठी अतिशय अवघड ठरणार असून त्यांना गुणांची टक्केवारी मिळेल की नाही, याबाबतही संभ्रम आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे