शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : शिवरायांना अभ्यासक्रमातून हद्दपार करणारे सरकार जातीयवादी- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:21 IST

शिवरायांचे चरित्र वाचले तर नवीन पिढी जातीयवाद उखडून फेकेल अन् या जातीयवादी सरकारला ते नको आहे.

ठाणे- शिवरायांचे चरित्र वाचले तर नवीन पिढी जातीयवाद उखडून फेकेल अन् या जातीयवादी सरकारला ते नको आहे. म्हणून या सरकारने शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रमच हद्दपार करण्याचा चंग बांधला आहे. मात्र, या जातीयवादी सरकारला आता महाराष्ट्रातील जनता हद्दपार करेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचे चरित्र हद्दपार करण्याचा डाव रचण्यात आला आहे. त्याचा आ. आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की,  एकीकडे शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करायचे; त्यांच्या नावावर मते मागायची आणि ज्या बालवयामध्ये शिवाजी महाराजांचे आचार-विचार मनावर बिंबवून या बालकांच्या मनावर शिवरायाचे संस्कार घडवायचे असतात. त्याच बालवयात शिकवल्या जाणार्‍या पुस्तकातूनच शिवराय हद्दपार करायचे. यामध्ये सरकारची ठरलेली नीती आहे. शिवाजी महाराज यांना खुपतात; शिवाजी महाराज यांना काट्याप्रमाणे आहेत, हे यांच्या मानसिकतेमध्ये आहे. म्हणून आंतराराष्ट्रीय उपक्रम, शैक्षणिक क्रम असे कायतरी शोधून काढले अन् चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजच गायब केले. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अणुरेणूत आहेत.आमच्या रक्तवाहिन्यांमध्ये आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी शिवाजी महाराज महाराष्ट्रातून हद्दपार तुम्ही करु शकत नाहीत. हद्दपार करण्याचा विचार पुस्तकाच्या माध्यमातून करणार्‍या या सरकारची पातळी आता महाराष्ट्राने ओळखली आहे. हे जातीयवादी सरकार आहे, शिवरायांच्या विरोधातील सरकार आहे. आणि म्हणून शिवराय यांना पुस्तकातही नकोत; कारण शिवरायांचे संस्कार झालेली पिढी जातीयवाद उखडून फेकेल, याची जाणीव असल्याने हे जातीयवादी सरकारने रचलेला कट महाराष्ट्रातील जनता उधळून लावेल.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019