शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे पिता पुत्रांवर मनसे आमदाराचा हल्लाबोल; "जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 17:45 IST

विधानसभा निवडणुकीत शिंदे सेना आणि मनसेत जोरदार जुंपली आहे. कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटलांविरोधात शिंदेंनी त्यांचा उमेदवार उतरवला आहे.  

डोंबिवली - जे बाळासाहेब ठाकरे यांचे झाले नाहीत ते राजसाहेबांचे काय होणार? या बाप बेट्याची दानत मला माहिती आहे असं सांगत येणाऱ्या निवडणुकीत वचपा काढणार असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला आहे. कल्याण ग्रामीणमध्ये शिंदे गटाकडून राजेश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यात ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर आणि मनसेकडूनराजू पाटील अशी तिरंगी लढत होणार आहे. लोकसभेला राज ठाकरे यांच्या मनसेनं नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसे आणि शिंदे सेनेत बिनसलं आहे.

आमदार राजू पाटील म्हणाले की, आम्हाला राजसाहेबांनी आदेश दिला, आम्ही लोकसभेला झोकून काम केले. ते ठाणे, कल्याणमध्ये निवडून आले. परंतु ते इथे उमेदवार देणार नाहीत अशी मला अपेक्षा नव्हती. आपल्याविरोधात उमेदवार येणार हे मी सहकाऱ्यांना सांगितले होते. मला या बाप बेट्याची दानत माहिती आहे. जे बाळासाहेब ठाकरेंचे झाले नाहीत ते राजसाहेबांचे होणार आहेत का...? मला स्थानिक राजकारणी म्हणून ही कल्पना होती. मला जो ५ वर्ष या लोकांनी त्रास  दिला. त्यात सूडाची भावना ठेवून उमेदवार देणार हे मला माहिती होते असा आरोप त्यांनी केला. 

तसेच माझ्या मनातला जो काही राग आहे तो मी या विधानसभेला बोलून काढणार. मलाही काही गोष्टी बोलायच्या होत्या. पक्षप्रमुखांनी आम्हाला आदेश दिल्यानंतर आम्ही प्रामाणिकपणे काम केले. परंतु याच लोकांनी मला संधी दिली त्यामुळे वचपा काढणार. खूप अडचणी दिल्या. कामात खोडा घातला. कल्याण ग्रामीणमध्ये चांगली लढत आहे. तिरंगी लढतीत आम्ही जिंकणार. गाणेही वाजणार आणि या लोकांनाही वाजवणार असा टोला राजू पाटील यांनी शिंदे पिता पुत्रांना लगावला. 

दरम्यान, ठाणे जिल्हा मुख्यमंत्र्‍यांचा बालेकिल्ला असला तरी कल्याण ग्रामीण मनसेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात मनसेचा एकमेव आमदार जनतेने निवडून दिलेला आहे. त्या जनतेचा सन्मान ठेवण्यासाठी राज ठाकरे इथून प्रचाराचा शुभारंभ करतायेत. विधानसभेच्या प्रचाराचा नारळ येथून फुटणार ही महाराष्ट्र सैनिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे . राज ठाकरेंचं माझ्यावर, अविनाश जाधव यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे ही पहिली सभा घेतली असंही आमदार राजू पाटील यांनी सांगितलं. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kalyan-rural-acकल्याण ग्रामीणthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024MNSमनसेRaju Patilराजू पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेShrikant Shindeश्रीकांत शिंदे