लोकशाहीर रमेश नाखवा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST2021-04-12T04:37:39+5:302021-04-12T04:37:39+5:30

ठाणे : अखिल भारतीय शाहीर परिषेदेचे अध्यक्ष रमेश हिराजी नाखवा यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे ...

Lokshahir Ramesh Nakhwa passes away | लोकशाहीर रमेश नाखवा यांचे निधन

लोकशाहीर रमेश नाखवा यांचे निधन

ठाणे : अखिल भारतीय शाहीर परिषेदेचे अध्यक्ष रमेश हिराजी नाखवा यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगे अभिनय आणि सचिन असा परिवार आहे.

संगीतकार श्रीनिवास खळे आणि दत्तू माणिक काेळी यांचे ते शिष्य हाेते. ठाण्याच्या माे. ह. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व दि युनायटेड स्पाेर्ट्स क्लबचे ते ज्येष्ठ खेळाडू हाेते. त्यांनी आकाशवाणी कलावंत म्हणूनही काम केले आहे. ठाणे महापालिकेत ते अधिकारी म्हणून कार्यरत होते. पालिकेने त्यांचा ‘ठाणे गौरव’ पुरस्कारने सन्मान केला होता. चेंदणी कोळीवाड्यात साजरा होणारा कोळी महोत्सव व होळी महोत्सवात त्यांचा नियमित सहभाग असे. मुंबई दूरदर्शनवर सादर करण्यात आलेल्या ‘मायबाप’ नाटकातील त्यांची भूमिका खूप गाजली होती.

---------

Web Title: Lokshahir Ramesh Nakhwa passes away