शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हत्येची सुपारी मंचेकर, साटमकडून

By admin | Updated: January 19, 2016 02:11 IST

बाळाराम म्हात्रे यांच्या खुनाची सुपारी सुरेश मंचेकर आणि गुरु साटम यांच्याकडून मिळाल्याची कबूली या प्रकरणात अटक केलेल्या उदयभान सिंग याने दिली आहे.

जितेंद्र कालेकर,  ठाणेबाळाराम म्हात्रे यांच्या खुनाची सुपारी सुरेश मंचेकर आणि गुरु साटम यांच्याकडून मिळाल्याची कबूली या प्रकरणात अटक केलेल्या उदयभान सिंग याने दिली आहे. मात्र, मंचेकरला या खूनाची सुपारी कोणी दिली, याचा शोध अद्याप सुरु आहे. दरम्यान, याच प्रकरणात पूर्वी अटक झालेले विद्यमान आमदार सुभाष भोईर आणि शरद भगत यांना पुन्हा चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.साबागाव, दिवा येथे बाळाराम यांची १९९० मध्ये हत्या करण्यासाठी सुरेश मंचेकर आणि गुरु साटम यांनीच सुपारी दिली होती, अशी माहिती उदयभानने पोलिसांना दिली आहे. त्यापोटी दोघांना साडेतीन लाख रुपये देण्याचे ठरले होते. चौबेला त्यातील दोन लाख तर उदयभानला दीड लाख रुपये मंचेकरने दिले होते. आंबिवलीच्या एका झोपडपट्टीमध्ये मंचेकरने या दोघांना बोलविले होते. तिथेच ही सुपारी देण्यात आली. उत्तरप्रदेशमधील विविध पोलीस ठाण्यांच्या परिसरात खुनाचे दोन आणि इतर गंभीर स्वरुपाचे अशा २१ गुन्हयांची नोंद असलेला उदयभान हा गुरु साटमचा लहानपणीचा मित्र आहे. साटम कारागृहात असतानाही ते एकमेकांच्या संपर्कात होते. साटम आणि मंचेकर हे एकाच टोळीतले. त्यामुळे या दोघांकडे बाळाराम यांना मारण्याची ‘सुपारी’ आली. त्यांनी ती उदयभान आणि त्याच्या साथीदारांना दिली. मंचेकरने त्यासाठी रिव्हॉल्व्हरही आणून दिले. ठरल्याप्रमाणे उदयभानने आपल्या साथीदारांसह बाळारामचा खून केला. त्यानंतर तो पसार झाला. मंचेकर टोळीचा वावर हा कल्याण-डोंबिवली परिसरातील असला तरी त्या टोळीने बांधकाम व्यवसाय, जमिनीची खरेदी-विक्री यातील व्यवसायांतूनही खंडणी मागितली होती. मंचेकर मारला गेल्यानंतर त्याची टोळी संपली असे जरी सांगितले जात असले तरी त्यांच्या टोळीचे सदस्य फुटले आणि वेगवेगळ््या मार्गाने त्यांनी इतर टोळ््यांचा आसरा घेतल्याचे सांगितले जाते. त्यातील काही सदस्य नंतरच्या काळातही या खून प्रकरणाशी संबंधित व्यक्तींच्या संपर्कात होते का याचा तपासही पोलिसांनी सुरू केला आहे. म्हात्रे प्रकरणाची फाइल उघडल्यानंतर जसा त्यातील स्थानिक टोळीयुद्धाचा वाद समोर आला, जमिनीचे वाद पुढे आले तशीच मंचेकरसह इतर टोळ््यांच्या सहभागाची माहितीही पुढे आल्याने यातून कोणकोणती कारस्थाने पुढे येतील याचा अंदाज बांधताना तपास अधिकारीही चक्रावले आहेत.