शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांविरोधात केडीएमसी आयुक्त उतरले रस्त्यावर; कल्याणमध्ये कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 00:05 IST

माल जप्त, विक्रेत्यांची पळापळ

कल्याण : केडीएमसी हद्दीतील फेरीवाल्यांविरोधात कारवाई होत नसल्याने राज्यमंत्री व नवनिर्वाचित आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना जमत नसेल तर बदली करून घ्यावी, असा सल्ला दिला होता. त्यानंतर गुरुवारी बोडके यांनी स्वत: रस्त्यावर उतरून कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई केली. त्यामुळे फेरीवाल्यांची पळापळ झाली. कारवाई पथकाने फेरीवाल्यांचा एक ट्रकभर माल जप्त केला. या कारवाईत सातत्य ठेवणार असल्याचे बोडके यांनी स्पष्ट केले.

डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. महापालिका अधिकाऱ्यांचे फेरीवाल्यांसोबत आर्थिक संबंध असल्याची टीका चव्हाण यांनी केली होती. तसेच बोडके यांना खरमरीत पत्र लिहून जमत नसेल तर बदली करून घ्या, असा सल्लाही दिला. त्यामुळे बोडके यांनी गुरुवारी स्वत: कारवाईसाठी पुढाकार घेतला.

बोडके यांनी ‘क’ प्रभाग अधिकारी भरत पवार आणि ‘ब’ प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांना अतिक्रमण पथकासह महापालिका मुख्यालयात बोलावून घेतले. मुख्यालयासमोरील दुकानांबाहेर लावलेल्या वस्तू जप्त केल्या. दुकानदार आणि कर्मचारी यांच्यात झटापट झाली. त्यानंतर कारवाई पथक शिवाजी चौक ते महंमद अली चौकादरम्यान पोहचले. पुष्पराज हॉटेल ते दीपक हॉटेलदरम्यान रस्त्यालगतच्या दुकानाबाहेर आलेले पत्रेही तोडण्यात आले. या कारवाईमुळे फेरीवाल्यांमध्ये एकच पळापळ झाली.कर्मचाऱ्यांअभावी कारवाई थंडावली होतीकारवाई संदर्भात बोडके म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेचे कर्मचारी घेण्यात आले होता. त्यामुळे महिनाभराच्या काळात कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले होते. निवडणूक संपताच आता कारवाईस सुरुवात केली आहे. दरम्यान, आमदारांनी पत्र दिले म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरलात का, असा प्रश्न आयुक्तांना विचारला असता त्याविषयी बोलणे टाळले.डोंबिवलीत बुधवारी रात्री कारवाई : केडीएमसीचे स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे व शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी बुधवारी रात्री डोंबिवली स्टेशन परिसरात ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग अधिकाºयांना घेऊन ४८ फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. तसेच दोन जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका