ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्याच्या किमया बवुआला १०० पैकी १००

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 22:25 IST2026-04-30T22:25:26+5:302026-04-30T22:25:26+5:30

आपल्या यशाचे रहस्य सांगताना किमया म्हणाली, “मी दररोज सहा ते आठ तास अभ्यास केला. सुरुवातीपासूनच कठीण विषयांवर अधिक लक्ष केंद्रित केले आणि नियमित सराव केला. त्यामुळेच हे यश मिळवता आले.”

ICSE Board Class 12th exam results declared Thane's Kimya Bavua scores 100 out of 100 | ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्याच्या किमया बवुआला १०० पैकी १००

ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ठाण्याच्या किमया बवुआला १०० पैकी १००


ठाणे : ICSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत ठाण्याच्या किमया बवुआ हिने विज्ञान शाखेत १०० पैकी १०० गुण मिळवत शाळेत प्रथम येण्याचा मान पटकावला. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. किमयाने दहावीच्या परीक्षेतही उल्लेखनीय यश मिळवले होते. त्या यशातून प्रेरणा घेत तिने बारावीच्या परीक्षेसाठी नियोजनबद्ध तयारी केली. दहावीपेक्षा अधिक गुण मिळवण्याचे स्वतःलाच दिलेले आव्हान तिने यशस्वीरीत्या पूर्ण केले.

आपल्या यशाचे रहस्य सांगताना किमया म्हणाली, “मी दररोज सहा ते आठ तास अभ्यास केला. सुरुवातीपासूनच कठीण विषयांवर अधिक लक्ष केंद्रित केले आणि नियमित सराव केला. त्यामुळेच हे यश मिळवता आले.” तिने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीय आणि शिक्षकांना दिले. “अभ्यासाचे योग्य नियोजन आणि सातत्य ठेवले, तर यश निश्चित मिळते,” असा संदेशही किमयाने विद्यार्थ्यांना दिला.

किमयाच्या या यशामुळे ठाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. तिचे वडील मयूर बवुआ यांनी आनंद व्यक्त करत सांगितले, “खूप छान वाटत आहे. किमया नेहमीच मेहनत करत आली आहे. तिला मिळालेले गुण तिच्या मेहनतीचे फळ आहे. आम्हाला तिचा अभिमान आहे. कुटुंबातील सर्वजण आनंदी आहेत. पुढे ती बिझनेस क्षेत्रात प्रवेश घेणार आहे.” ती सुलक्षणा देवी सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title : आईसीएसई बोर्ड परिणाम: ठाणे की किमया बवा ने 100/100 अंक प्राप्त किए!

Web Summary : ठाणे की किमया बवा ने आईसीएसई 12वीं की परीक्षा में विज्ञान में 100 अंक प्राप्त कर स्कूल में टॉप किया। उसने अपनी सफलता का श्रेय केंद्रित अध्ययन और निरंतर अभ्यास को दिया। किमया के पिता ने बहुत गर्व व्यक्त किया, उन्होंने उसकी मेहनत और व्यवसाय में भविष्य की योजनाओं का उल्लेख किया।

Web Title : ICSE Board Result: Thane's Kimaya Bawa scores 100/100!

Web Summary : Thane's Kimaya Bawa topped her school in the ICSE 12th exams, scoring a perfect 100 in science. She attributes her success to focused study and consistent practice. Kimaya's father expressed immense pride, noting her hard work and future plans in business.