शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत 65 लाखांचा गुटखा जप्त , अन्न सुरक्षा विभागाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 16:49 IST

भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या तीन ट्रकमधील 280 गोण्यात असलेला 65 लाख 78 हजार रुपय किमतीचा विमल सुगंधित पान मसाला व गुटखा व 36 लाख रुपयांचे तीन ट्रक ताब्यात घेत कारवाई केली आहे.

भिवंडी- महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रीस प्रतिबंध असतानाही शेजारील गुजरात राज्यातून विविध मार्गे कोट्यवधी रुपयांचा गुटखा , पान मसाला महाराष्ट्रात विक्री केला जात असून, ठाणे येथील अन्न सुरक्षा पथकाने भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे रात्रभर पाळत ठेवून तीन ट्रकमधून भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या तीन ट्रकमधील 280 गोण्यात असलेला 65 लाख 78 हजार रुपय किमतीचा विमल सुगंधित पान मसाला व गुटखा व 36 लाख रुपयांचे तीन ट्रक ताब्यात घेत कारवाई केली आहे.

ठाणे अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत भिवंडी शहराच्या दिशेने गुजरात येथून तीन ट्रक मधून गुटखा व सुगंधित तंबाखू येत असल्याची माहिती समजली असता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे व कोकण विभाग सह आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा निरीक्षक माणिक जाधव, एस एम वधारकर ,एम एम सानप ,ए डी खडके या पथकाने खारबाव येथे एका धाब्यावर रात्रभर पाळत ठेवून गुरुवारी पहाटेच्या सुमारास पंधरा पंधरा मिनिटांच्या अंतराने आलेले तीन आयशर ट्रक अडवून त्यांची चौकशी केली असता  त्यामध्ये 280 गोणी विमल सुगंधित पान मसाला व तंबाखू गुटखा आढळून आला.या कारवाईत ट्रक चालक मोहम्मद आदिल व उदल यादव या दोघांना ताब्यात घेतले आहे . मात्र तिसरा ट्रक चालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाला या तिन्ही ट्रक मधून 65 लाख 78 हजार रुपयांचा गुटखा व 36 लाख रुपयांचे तीन ट्रक असा एकूण 1 कोटी 1 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत त्यांच्या विरोधात भादवी कलम 272,273,188,328  सह अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 59 अंतर्गत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .