रायगडमधील सरकारी कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरूच!

By Admin | Updated: August 18, 2015 23:27 IST2015-08-18T23:27:53+5:302015-08-18T23:27:53+5:30

अनुसूचित जमातींच्या कल्याणाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधी मंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती बुधवारी रायगड जिल्ह्यामध्ये दाखल होत आहे

Government offices in Raigad continue on holidays | रायगडमधील सरकारी कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरूच!

रायगडमधील सरकारी कार्यालये सुटीच्या दिवशीही सुरूच!

अलिबाग : अनुसूचित जमातींच्या कल्याणाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र विधी मंडळाची अनुसूचित जमाती कल्याण समिती बुधवारी रायगड जिल्ह्यामध्ये दाखल होत आहे. १९, २० आणि २१ आॅगस्ट २०१५ या कालावधीत समिती रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालय, विविध नगरपालिका आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बैठका घेणार आहे.
समिती येणार असल्याने मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अशी सर्व महत्त्वाची कार्यालये सुटी असूनही खुली होती. समितीला आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, असे जिल्हा नियोजन अधिकारी तथा समितीचे समन्वयक सुनील जाधव यांनी सांगितले.

Web Title: Government offices in Raigad continue on holidays