उल्हासनगरात खड्ड्यांनी घेतला चौथा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:03 AM2019-09-20T06:03:10+5:302019-09-20T06:03:12+5:30

पवई चौकातील खड्ड्यांमुळे मोटारसायकलस्वार तरुण पडून त्याला भरधाव डम्परने चिरडल्याची घटना बुधवारी घडली.

Fourth victim of potholes in Ulhasnagar | उल्हासनगरात खड्ड्यांनी घेतला चौथा बळी

उल्हासनगरात खड्ड्यांनी घेतला चौथा बळी

Next

उल्हासनगर : पवई चौकातील खड्ड्यांमुळे मोटारसायकलस्वार तरुण पडून त्याला भरधाव डम्परने चिरडल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पालिकेवर सदोष मनुष्यवधाच्या कलमान्वये कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगरात रस्त्याची दुरवस्था झाली असून, मोटारसायकली घसरून अपघात होत आहेत. म्हारळ गावातील आतिष भोईर व घनश्याम शिंपी हे दोघे मित्र मोटारसायकलने बुधवारी दुपारी २ वाजता पवई चौकातून जात होते. त्यावेळी मोटारसायकल घसरून दोघेही पडले. त्यावेळी भरधाव डम्परखाली सापडून घनश्याम शिंपी (वय २१) हा चिरडला गेला, तर आतिष भोईर हा जखमी झाला. मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन डम्परचालक चरण मोरे याला अटक केली.
शहरातील खड्ड्यांमुळे आणखी एका तरुणाचा बळी गेला असून, दोन महिन्यांत चौघांचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
>मोटारसायकलस्वाराचा अपघाती मृत्यू
ठाणे :पारसिकनगर येथे भरधाव मोटारसायकलवरून घसरून तुषार कुलकर्णी (३८) याचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी हयगयीने मोटारसायकल चालवल्याने तुषार याच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Fourth victim of potholes in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.