शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त

By admin | Updated: June 21, 2017 04:25 IST

गेल्यावर्षी महाराष्ट्रात पाण्याअभावी दुष्काळ होता. त्यामुळे नागरिक व शेतकरी होरपळून निघाला होता. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : गेल्यावर्षी महाराष्ट्रात पाण्याअभावी दुष्काळ होता. त्यामुळे नागरिक व शेतकरी होरपळून निघाला होता. त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबवली. त्यामुळे यंदाच्यावर्षी राज्यात पाण्याचे मागच्या वर्षीच्या तुलनेत दुर्भिक्ष्य नाही. येत्या पाच वर्षात महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे ध्येय भाजप सरकारने डोळ््यासमोर ठेवले असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.केंद्र सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कल्याण स्पोर्ट कॉमप्लेक्समध्ये जनहिताचे कुठले निर्णय घेतले याची माहिती देणारा कार्यक्रम झाला. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टतर्फे कार्यक्रम झाला. याप्रसंगी जेएनपीटीचे व्यवस्थापक डी. नरेश, विश्वस्त विवेक देशपांडे, आमदार नरेंद्र पवार आणि उपमहापौर मोरश्वर भोईर आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेमुळे ११ हजारापेक्षा अधिक गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. ही योजना भाजपा सरकारने प्रभावीपणे राबवली. त्यामुळे यावर्षी मे अखेरीस पाणीटंचाईची झळ मोठ्या प्रमाणात जाणवली नाही. संरक्षण साधन सामग्रीची टक्केवारी ५० वर नेली. यूपीए सरकारच्या काळात हीच टक्केवरी केवळ १० होती. त्यात ४० टक्के वाढ केली आहे. सर्जिकल स्ट्राईक करुन शत्रू राष्ट्राला चांगलाच धडा शिकवला. सरकार सगळ््याच बाबतीत सतर्क व संवेदनशील आहे. आधारकार्ड, मोबाइल आणि कॅशलेसमुळे विविध ९२ जनहितकारी योजनांचा लाभ कोणत्याही दलालांशिवाय थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. हे सरकार पारदर्शक व गतीमान आहे, असे ते म्हणाले.