शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले; सूर्या नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा, जनजीवन झाले विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 13:06 IST

धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडल्याने सूर्या नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सूर्या नदीला पूर आला असून प्रशासनाने सूर्या नदीकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे

कासा : डहाणू तालुक्यात जोरदार पाऊस झाला असून  गेल्या दोन दिवसात कासा परिसरात पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. परिसरातील नदी-नाले तुडुंब भरल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून बुधवारी  सकाळी धरणाचे पाचही दरवाजे उघडले आहेत. धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडल्याने सूर्या नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सूर्या नदीला पूर आला असून प्रशासनाने सूर्या नदीकिनारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या मोठ्या पावसामुळे चारोटी  गुलझारी नदीला पूर आला असून चारोटी येथील पुलावरून पाणी जात असल्याने डहाणू- कासा मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.  कासा पोलिसांनी रस्त्यावर बॅरिकेट्स लावले आहेत. या गुलझारी नदीकिनारी चारोटी नाक्यावर असलेल्या दुकानात पाणी शिरले असून नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या सततच्या पावसाने गंजाड, रानशेत, चारोटी, कासा रस्त्यावर पाणी शिरून वाहतूककोंडी होत आहे.पेठ, म्हसाड पूल पाण्याखाली गेल्याने येथील गावांचा संपर्क  तुटला आहे तसेच सारणी उर्से अनेक नाले  पुरामुळे पाण्याखाली गेल्याने सारणी, आंबिवली, निकावली, म्हसाड, उर्से साये, अंबिस्ते आदी गावांचा संपर्क तुटला होता. 

टॅग्स :thaneठाणेDamधरणpalgharपालघर