शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत अग्नीतांडव सुरूच; केमिकल गोदामाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 21:10 IST

Fire : घटनास्थळी अग्निशमन दल दाखल 

ठळक मुद्देया आगीत केमिकलच्या ड्रमचा मोठ्या प्रमाणात स्फोट होत असल्याने येथील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

नितिन पंडीत

भिवंडी - गोदाम व यंत्रमाग मोठ्या प्रमाणात असलेल्या भिवंडीतआग लागण्याचे सत्र थांबता थांबत नसून शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका गोदाम कारखान्यास भीषण आग लागल्याची घटना खोणी ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या मिठपाडा येथील साईनाथ कंपाउंड येथे घडली आहे. या ठिकाणी एका बंद कारखान्यात केमिकलचा अवैध साठा करून ठेवण्यात आला होता. या आगीत केमिकलच्या ड्रमचा मोठ्या प्रमाणात स्फोट होत असल्याने येथील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे दाटी वाटीच्या ठिकाणी असलेल्या या कारखान्यात केमिकलच्या ड्रमला लावलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात केमिकल मिश्रित धूर पसरल्याने येथील नागरिकांना डोळे चुरचुरने व घशाला खवखवण्यासारखे त्रास होत असून नागरिकांना श्वास घेण्यास देखील अडचण होत आहे. विशेष म्हणजे हा कारखाना नेमकी कुणाचा असून या कारखान्यात हे केमिकलचे ड्रम नेमकी कोणी ठेवले आहेत.

याबाबत अजूनही अधिकृत माहिती मिळत नसून आगीचे नेमकी कारण देखील समजले नाही. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी मनपाच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून पाणी व फोमच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने या आगीमुळे जिवीत हानी झाली नसली तरी केमिकलच्या ड्रमचा मोठमोठ्याने स्फोट होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलbhiwandiभिवंडी