शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात छताचे प्लास्टर पडून मायलेक जखमी; आईला मुंबईच्या सायन रुग्णालयात हलवले

By अजित मांडके | Updated: July 24, 2024 12:54 IST

...यामध्ये सुनंदा वारंग (६३) आणि दिनेश (३८) असे मायलेक जखमी झाले आहेत. सुनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

 ठाणे: लोकमान्य नगर पाडा क्रमांक ०३ या ठिकाणी असलेल्या तळ अधिक एक मजली तुळजाभवानी निवास या चाळीच्या घरातील तळ मजल्याच्या रूममधील छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुनंदा वारंग (६३) आणि दिनेश (३८) असे मायलेक जखमी झाले आहेत. सुनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.                लोकमान्य नगर पाडा क्रमांक ०३ येथील मायलेक छताचे प्लास्टर पडून जखमी झाल्याची माहिती कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉ योगेश यांनी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानुसार घटनास्थळी सहाय्यक आयुक्त (लोकमान्य सावरकर प्रभाग समिती), कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग-लोकमान्य सावरकर प्रभाग समिती), अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (लोकमान्य सावरकर विभाग समिती) व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. त्या चाळीत तळ आणि पहिल्या मजल्यावर प्रत्येकी तीन- तीन असे सहा रूम आहेत.

यातील रूम नंबर ०१ मधील प्लास्टर पडले असून ती रूम नम्रता वेंगुर्लेकर यांच्या मालकीची आहे. तेथे जखमी वारंग कुटुंब भाड्याने राहत आहेत. तसेच त्या चाळीचे बांधकाम अंदाजे २० ते २५ वर्षे जुने आहे. या घटनेत सुनंदा वारंग यांच्या छातीला, पोटाला तसेच उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना सुरुवातीला कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ  दाखल करण्यात आले होते, तेथून त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दिनेश यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर घटनास्थळी लोकमान्य-सावरकर प्रभाग समिती यांचे मार्फत पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

 

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल