शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
3
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
6
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
7
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
8
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
9
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
10
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
11
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
12
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
13
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
14
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
15
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
16
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
17
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
18
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
19
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
20
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरमध्ये एमआयडीसीतील कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू तर ३ जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 11:27 IST

एमआयडीसीतील के जे रेमेडिज नावाच्या कंपनीत ही घटना घडली.

ठाणे - बदलापूर परिसरात असणाऱ्या एमआयडीसीतील कंपनीत आज सकाळी ९ च्या सुमारास जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला तर इतर तिघे जखमी झाले. 

एमआयडीसीतील के जे रेमेडिज नावाच्या कंपनीत ही घटना घडली. सकाळच्या सुमारास कंपनीतील ड्रायरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे काही भागात आग लागली. या आगीवर अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्यात आलं असून स्फोटातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. 

बदलापूर येथील के जे रेमेडीज या कंपनीत ड्रायरचा स्फोट झाल्याने त्या ठिकाणी काम करणाऱ्या विष्णू धडाम या ऑपरेटरचा मृत्यू झाला आहे. याच ठिकाणी काम करणाऱ्या विजय पिंग्वा हा 20 वर्षीय तरुण 90 टक्के भाजला आहे. झागरा मोहतो हे 56 वर्षे कामगार 80 टक्के भाजले आहेत, तर त्यांच्यासोबतच काम करणारा विनायक जाधव या 55 वर्षीय कामगाराला देखील या स्फोटाचा फटका बसला असून ते देखील 40 टक्के भरले आहे. या तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना बदलापूरच्या खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढे ऐरोलीच्या बर्न सेंटर मध्ये पाठवण्यात आले आहे.  या कंपनीमध्ये रासायनिक पदार्थांवर प्रक्रिया करून त्याची ड्रायरमध्ये पावडर तयार करण्याचे काम सुरू होते. या ड्रायरमध्ये प्रचंड दाब वाढल्याने त्या ड्रायरचा स्फोट झाल्याचे अग्निशमन विभागाने स्पष्ट केले आहे.

ड्रायरच्या परिसरातच काम करणारे चारही कामगार गंभीररीत्या भाजले होते. त्यातील विष्णु यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर गंभीर जखमी झालेले कामगार बाहेर पडले त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. मात्र त्यात तीन गंभीर जखमी पैकी दोन जण 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त भरल्याने त्यांना मृत्यूशी सामना करण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :Blastस्फोटMIDCएमआयडीसी