शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

नगरसेवकपद रद्द का करु नये ? भाजपा गटनेत्याने बजावलेल्या नोटीसला माजी महापौरांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 8:54 PM

 कोणताही पक्षादेश वा सूचना नसल्याने त्याचे पालन केले नाही हा आरोप अमान्य असल्याचे जैन यांनी म्हटले

मीरारोड : मीरा-भार्इंदर भाजपातील आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात दंड थोपटणा-या भाजपाच्या माजी महापौर गीता जैन यांना महाभेतील दोन ठरावांवर तटस्थ राहिल्याबद्दल पक्ष विरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत थेट नगरसेवकपद रद्द करण्याच्या गटनेत्याने दिलेल्या नोटीसला जैन यांनी उत्तर दिलंय.  कोणताही पक्षादेश वा सूचना नसल्याने त्याचे पालन केले नाही हा आरोप अमान्य असल्याचे जैन यांनी म्हटले आहे . महापौरपदी असल्यापासून स्थानिक भाजपा आमदार नरेंद्र मेहतांकडून डावललं गेल्याबद्दल दंड थोपटणा-या माजी महापौर गीता जैन यांनी तर आता विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवल्याने सद्या जैन विरोधात मेहता व त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यातुनच २० व २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत माजी महापौर गीता जैन ह्या दोन ठरावांसाठी झालेल्या मतदानावर तटस्थ राहिल्या होत्या. मेहतांचे निकटवर्तीय भाजपा गटनेते हसमुख गेहलोत यांनी जैन यांना ४ मार्च रोजी नोटीस काढली. पक्षाच्या सदस्यांनी मांडलेला ठराव व त्या बाजुने सर्व भाजपा नगरसेवकांनी मतदान केले असताना  जैन यांनी तटस्थ राहणे पक्षविरोधी असल्याने ८ दिवसात खुलासा करा. अन्यथा महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अनर्हता अधिनियम १९८६ अन्यवये शिस्तभंगाची म्हणजेच नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई केली जाईल  बजावले होते.  लोकमतने सर्वात प्रथम हे वृत्त दिल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान जैन यांनी गटनेत्याच्या नोटीसला उत्तर दिल्याचे सुत्रांकडून कळले असून त्यामध्ये महासभेस उपस्थित राहण्याबद्दल, मतदान कसे करावे वा तसा पक्षादेश काढल्याबद्दल कसलीही प्रसिध्दी नव्हती. सभागृहाच्या प्रवेशद्वारावर देखील कसली सूचना दिली नव्हती असे नमुद केले आहे. त्यामुळे पक्षादेशचे पालन केले नाही हा आरोप अमान्य असल्याचे जैन यांनी म्हटले आहे. काय होते ते ठराव : प्रारप विकास आराखड्या बद्दल चर्चा विनीमय करुन निर्णय घेण्याचा विषय ऐनवेळी आणताना ठरावात येत्या महासभेत विकास आराखडा सादर करण्याचा तसेच आराखडा फुटीची बातमी खोटी ठरल्यास पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्याचे नमुद होते.  त्याच ठारावात  शासनाने नियुक्त केलेल्या सहाय्यक नगररचनाकार यांना तत्काळ सेवेतुन मुक्त करुन पालिकतील अधिकारयास त्या पदी नियुक्त करा असे देखील मंजुर केले होते.  तर शहरातील पे एण्ड पार्कचे दर वाढविण्याच्या प्रस्तावात देखील पार्किग इमारतीत मार्केट सुरु करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला होता. भाजपाकडून महासभेत आणले जाणरे काही विषय या आधी देखील वादग्रस्त ठरले आहेत. पण एकछत्री वर्चस्वामुळे अडचणीच्या वा नियमबाह्य ठरावांना नाईलाजाने हात वर करावा लागतो असे देखील खाजगीत बोलले जाते.  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर