Join us

२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 8:55 AM

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. २३ दिवस उलटूनही अद्याप त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. लेकाचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याचे वडील हरगीत सिंग चिंतेत आहेत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग २२ एप्रिलपासून बेपत्ता आहे. २३ दिवस उलटूनही अद्याप त्याचा काहीच पत्ता लागलेला नाही. लेकाचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याचे वडील हरगीत सिंग चिंतेत आहेत. बेपत्ता होण्याच्या १ दिवस आधी २१ एप्रिलला ते गुरुचरणशी शेवटचे बोलले होते. तेव्हापासून त्याचा फोनही आलेला नाही. आता त्याच्याबद्दल बोलताना हरगीत सिंग भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. 

दैनिक भास्करशी बोलताना हरगीत सिंग म्हणाले, "मी म्हातारा झालो आहे. माझी तब्येतही ठीक नसते. मुलाची वाट पाहून आता मी थकलो आहे. कोणत्याही परिस्थितीत मला फक्त माझ्या मुलाला पाहायचं आहे. तो जिथे कुठे असेल. मी प्रार्थना करतो की लवकर परत येईल. आम्ही पोलिसांच्याही संपर्कात आहोत. एक-दोन दिवसांत गुरुचरण सिंगबाबत अपडेट देतील असं पोलिसांनी सांगितलं आहे. २१ एप्रिलला मी शेवटचं त्याच्याशी बोललो होतो". 

२२ एप्रिलला दिल्ली एअरपोर्टवरुन गुरुचरण सिंग बेपत्ता झाला होता. दिल्लीवरुन तो विमानाने मुंबईला येण्यास निघाला होता. एअरपोर्टवरुन त्याने विमानात चढत असल्याचा मेसेजही मित्राला केला होता. पण, तो विमानात चढलाच नाही. दिल्लीतील पालम भागात त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन सापडलं. गुरुचरण सिंग डिप्रशेनमध्ये होता. आर्थिक संकंटाचा सामनाही तो करत होता. त्याचं लग्नही होणार होतं. पण, अचानक तो गायब झाल्याने कुटुंबीय आणि सहकलाकारही चिंतेत आहेत. 

गुरुचरण सिंगने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारली होती. अनेक वर्ष काम केल्यानंतर या मालिकेतून त्याने एक्झिट घेतली होती. गुरुचरण सिंग बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर जाऊन कलाकारांची चौकशी केली होती. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकार