शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शौर्यगाथा सांगणारा मांडवी किल्ला बनला दारूचा अड्डा

By admin | Updated: October 16, 2015 01:49 IST

वसई पूर्वेकडे चिमाजी आप्पांची शौर्यगाथा सांगणारा ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेला किल्ले मांडवी कोट. गडकोटाच्या माहितीपटावर हा किल्ला नामशेष झाला

सुनील घरत, पारोळवसई पूर्वेकडे चिमाजी आप्पांची शौर्यगाथा सांगणारा ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेला किल्ले मांडवी कोट. गडकोटाच्या माहितीपटावर हा किल्ला नामशेष झाला असून तो ऐतिहासिक वारसा समाजाच्या विस्मृतीत गेला आहे. आज त्याचा वापर चक्क शौचालयासारखा तसेच दारू पिण्यासाठी निवांत जागा म्हणून केला जातो.वसई तालुक्यातील गडकोटांच्या यादीत मांडवी किल्ल्याचे महत्त्वाचे स्थान आहे. पुस्तकांत मांडवी किल्ला नामशेष झाला, असा उल्लेख आढळतो. पण, त्या जागी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केल्यास किल्ल्याच्या दोन्ही तटांस असणारी तटबंदी कोरीव मृर्तींच्या शिळा, तटबंदीतील शिल्पे इ. अनेक इतिहासाची साक्ष देणारे अवशेष दिसून येतात. त्याचप्रमाणे किल्ल्याजवळ मोठा तलावही आहे. या तलावाच्या काठावर कोरीव शिळांचे अवशेष पाहावयास मिळतात. पण, हा किल्ला आज मानवी अतिक्रमणाच्या विळख्यात असून या किल्ल्याच्या अवशेषावर पाण्याची टाकीही बांधली असल्याचे दिसते. वसई मोहिमेचा सुवर्णकाळ जपणारा किल्ला मांडवी आज शौचालय बनला आहे. तो केविलवाण्या अवस्थेतच संवर्धनाची वाट पाहत आहे. तर, पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याची नोंद संरक्षित स्मारकात आहे की असंरक्षित स्मारकात आहे, हेही एक कोडेच आहे.मानवी अतिक्रमण वाढल्याने दुर्गांचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. वसई प्रांताचा प्रामाणिक इतिहास सांगणारा मांडवी कोट आज नामशेष होण्याच्या मार्गावर असून वसईतील दुर्गप्रेमींनी एकदा तरी या किल्ल्याच्या संवर्धनासाठी अभ्याससफर करावी, असे श्रीदत्त राऊत यांनी दुर्गप्रेमींना आवाहन केले आहे.