शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
9
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
10
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
11
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
12
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
13
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
14
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
15
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
16
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
17
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
18
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
19
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
20
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
Daily Top 2Weekly Top 5

शहापूरचे दापूर गाव महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे महिन्यांपासून अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 15:03 IST

Shahapur News : महावितरण विभागाची हलगर्जी व निष्काळजी कारणीभूत असल्याचा आरोप त्रस्त गावकऱ्यांकडून केला जात आहे.

ठाणे - शहापूर तालुक्यातील दापूर गावाला वीज पुरवठा करणारे वीज रोहित्र (डेपो) झाल्यामुळे येथील गावकरी एक महीन्यापासून अंधारात आहे. याला महावितरण विभागाची हलगर्जीपणा व निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप त्रस्त गावकऱ्यांकडून केला जात आहे. जंगल, दऱ्याखोऱ्यातील या गावातील रहिवाशांना साप, विंचू, किडे आदी जीव घेणाऱ्या सरपटणाऱ्या जनावरांच्या भीतीने येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन या पावसात वावरत आहेत. सततच्या पावसाने बियांमध्ये पाणी शिरल्याने सरपटणारे प्राणी गावाकडे, घरांच्या आसऱ्याला, कोरड्या जागेच्या शोधात या परिसरात वावरत आहेत. गवतात, झाडाझुडुपांमध्ये ते सरपटताना दिसत आहे.

रात्री अंधारात दंश करून ते जीव घेण्याची भीती या गावकऱ्यांना सतावत आहे. महिन्यापासून अंधारात चाचपडत असलेल्या या गावकऱ्यांनी महावितरणच्या खर्डी येथील कार्यालयात कैफियत मांडून, पाठपुरावा करुनही वीज पुरवठा पूर्ववत झाला नसल्याची खंत येथील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. येथील ७५ घरांमधील लहानथोर मिळून एक हजार लोकसंख्येच्या या गावाला एक महिन्यापासून अंधारात राहावं लागत असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण गाव अंधारात असल्याने येथील शेतकरी, कष्टकरी, महिला, लहान मुले आदींना जीव घेण्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या वीज मंडळाच्या खर्डी कार्यलयाला वारंवार तक्रार करूनही दाद दिली जात नाही. या दापूर गांवाला वीज पुरवठ्या अभावी अंधाराबरोबर विविध समस्यांशी संघर्ष करावा लागत आहे. 

वीजे अभावी गिरण्या बंद आहेत. त्यामुळे ज्वारी, बाजरी, तांदूळ देण्यासाठी अन्य गावांमध्ये, खर्डीला पायपीट करावी लागत आहे. मोबाईल चार्ज नसल्याने रात्री बेरात्री, संकटकाळी संपर्क करणे शक्य नाही. यावर वेळीच लक्ष केंद्रीत करण्यासाठी खर्डी घ्या वीज कार्यालयाचे लक्ष वेधले आहे. मात्र अजूनही त्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला नसल्याची खंत येथील संतोष शिगवा, गणेश वाघ यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. या वीज पुरवठ्या अभावी उद्भवणाऱ्या संकटास महावितरणला जबाबदार धरण्याचा इशारा या त्रस्त गावकऱ्याकडून दिला जात आहे. 
 

टॅग्स :electricityवीजShahapurशहापूरthaneठाणे