शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ऐसपैस रस्त्यांना खोदकामांचा शाप; तलावांचे शहर बनले वाहनकोंडीचे डेस्टिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 06:55 IST

सकाळी व संध्याकाळी ठाणेकरांचा पाच किलोमीटरचा प्रवास कमीतकमी अर्धा ते पाऊण तासावर जातो, तोपर्यंत डोंबिवलीकर घरी पोहोचलेले असतात.

योगेश बिडवईउप-वृत्तसंपादक

ठाणे शहरात गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते ऐसपैस झाले आहेत. ठाणेकरांना म्हणायला मोठे रस्ते असले तरी ठिकठिकाणची दुरुस्ती कामे, काही रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी केलेली पार्किंग आणि हे कमी म्हणून की काय मेट्रोच्या कामासाठी ठिकठिकाणी केलेले खोदकाम यामुळे शहरात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यात लेन कटिंग करणारे आणि राँग साइडने वाहन चालविणारे ठाणेकरांच्या कोंडीत आणखी भर घालीत आहेत. 

सकाळी व संध्याकाळी ठाणेकरांचा पाच किलोमीटरचा प्रवास कमीतकमी अर्धा ते पाऊण तासावर जातो, तोपर्यंत डोंबिवलीकर घरी पोहोचलेले असतात. जवळपास सर्वच मुख्य रस्त्यांवर सुरू असलेली कामे पावसाळ्यापूर्वी संपतील, याची काही शाश्वती नाही. नितीन कंपनी चाैकातील सेवा रस्त्याला लागूनच मेट्राेच्या कामासाठी खाेदकाम केले जात आहे. त्यामुळे हा रस्ता नितीन कंपनी ते अग्निशमन दलापर्यंत अर्धाच झाला आहे. काेरम माॅल ते कॅडबरी कंपनी चाैकापर्यंत केबल वाहिनीच्या कामासाठी पुन्हा रस्ता खोदला आहे. कॅडबरी चाैकातही मेट्राेसाठी खाेदकाम केले आहे.  विवियाना माॅलकडे जाणाऱ्या रस्त्यावरही खाेदकाम. एवढे पुरेसे नाही, तर कासारवडवली, पातलीपाडा ते मानपाडा आणि मानपाडा ते पातलीपाडा या मार्गावर रस्ते  दुरुस्तीसाठी खाेदकाम झाले आहे.  

उन्हाचा तडाखा वाढल्याने वाहतूक कोंडीत ठाणेकर घामाघूम होत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगसाठी वाहनधारकांना जणू परवानाच मिळाला आहे. कॅडबरी ते कोरम मॉलचा रस्ताही मेट्रोच्या खोदकामामुळे जर्जर झाला आहे. मानपाडा उड्डाणपुलाच्या बाजूचा रस्ता दुरुस्तीसाठी बंद आहे. ठाण्यातील रस्त्यावरील खोदकाम पाहिल्यानंतर कुंभमेळानगरी नाशिकची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कुंभमेळ्याच्या कामासाठी अख्खे नाशिक शहर खोदून काढले आहे. तेथे नाशिककरांनी त्याविरोधात आवाज उठविला आहे. मात्र, ठाणेकर खूपच सोशिक. रोजच्या वाहतूक कोंडीवर काही बोलायला तयार नाहीत. सत्ताधारी विकासकामांमध्ये मग्न आहेत आणि विरोधकांना हा प्रश्न मांडावासा वाटत नाही. मुंबईची ‘सिस्टर सिटी’ म्हटले जाणाऱ्या ठाण्याचे हे दुर्दैव नाही तर दुसरे काय?

तलावांचे शहर बनले वाहनकोंडीचे डेस्टिनेशनतलावांचे शहर ठाणे आता वाहतूक कोंडीचे डेस्टिनेशन बनले आहे. याकडे ना पोलिसांच्या वाहतूक विभागाचे लक्ष, ना प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून काही हालचाल. सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिकेचे काम जणू रस्ते खोदणेच हेच आहे, असे चित्र दिसते. मेट्रोने कामाची गती वाढविणे आवश्यक आहे. जानेवारी २०२६ मध्ये सुरू होणारी मेट्रो एप्रिल संपत आला तरी सुरू झालेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Thane's roads plagued by digging, city becomes traffic jam destination.

Web Summary : Thane's roads are dug up for metro work, causing traffic chaos. Road repairs, parking, and metro construction worsen congestion. Commutes are lengthy, and citizens are frustrated. Authorities seem indifferent to the issue.
टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी