शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

हार-तुऱ्यांसाठी दररोज साडेपाच हजारांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 01:25 IST

ठामपाचा प्रस्ताव : पवार यांचा आक्षेप

 लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिकेतील छोट्या-मोठ्या समारंभांबरोबरच पाहुण्यांना पुष्पगुच्छ, हार-तुरे, फुले, तुळशीचे रोप आदी साहित्य देण्यासाठी दररोज साडेपाच हजार रुपये खर्च करण्याचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षांसाठी तब्बल ४० लाख रुपयांचे कंत्राट देण्याच्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महासभेत ठेवलेल्या प्रस्तावाला भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आक्षेप घेतला आहे.

महापालिकेतील विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ व उपक्रमांसाठी आणि पदाधिकारी-अधिकारी यांना पुष्पगुच्छ, तुळशी रोप, हार, तुरे, फुलांची सजावट आदी करण्यासाठी निविदा मागविली होती. मात्र, दोन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ एकाच कंत्राटदाराने ती भरली होती. या कंत्राटदाराने दोन वर्षांसाठी ४० लाख रुपये आकारले आहेत. त्यात तुळशीचे रोप ३० रुपये, १२ फूट पुष्पहार २१०० रुपये, ८ फूट पुष्पहार १००० रुपये, ६ फूट डबल हार, व्हीव्हीआयपी बुके ८०० रुपये, व्हीआयपी बुके ५५० रुपये, बुके मिडियम २८० रुपये, छोटा बुके १८० रुपये, फुलांचे चार पदरी तोरण १२० रुपये फूट, फुलांची माळ प्रति फूट १५ रुपये, गुलाबाचे फूल ७ रुपये, सोनचाफ्याचे फूल ४ रुपये असा दर निश्चित केला. तोही वाटाघाटीनंतर ठरविला. तसेच बाजारभावापेक्षा तो कमी असल्याचे महापालिकेच्या गोषवाऱ्यात म्हटले आहे.

एकच निविदा प्राप्त कोरोनामुळे ठामपाचे उत्पन्न घटणार आहे. प्रशासनाकडून एकीकडे नगरसेवक निधीवर कात्री चालविली जाते. मात्र, अन्य बाबींवर उधळपट्टी सुरू आहे. समारंभांसाठी पुष्पगुच्छ, हार-तुऱ्यांसाठी दरवर्षी २० लाख खर्च करण्याचा प्रकार संतापजनक आहे. त्यानुसार मनपाकडून पुष्पगुच्छ व हारांसाठी दररोज किमान साडेपाच हजार रुपये खर्च केला जाणार आहे. तर मासिक एक लाख ६७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. पुष्पगुच्छ व हार-तुरे पुरविण्यासाठी केवळ एकच निविदा प्राप्त झाली आहे. या निविदाकारालाच मंजुरी देण्याचा घाट का घातला जात आहे? असे सवाल पवार यांनी विचारले आहेत. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका