शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus news: धक्कादायक! ठाण्यात कोरोनामुळे २४ तासांतच दोन पोलिसांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 22:01 IST

गेल्या २४ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून तीन अधिकाऱ्यांसह आठ पोलीस नव्याने बाधित झाले आहेत. आतापर्यंत २१ कोरोनाबाधितांचा तर दोन कोरोना संशयित पोलिसांचा मृत्यु झाला आहे.

ठळक मुद्देनव्याने आठ पोलिसांना लागणबाधितांमध्ये पोलीस निरीक्षकासह तीन अधिकाऱ्यांचा समावेशआतापर्यंत २१ पोलिसांचा मृत्यु

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: गेल्या २४ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. कोपरी पोलीस ठाण्यातील हवालदार राजेंद्र महाडीक (५१, रा. कशेळी, भिवंडी) यांचा कोरोनावरील उपचारादरम्यान रविवारी तर विशेष शाखेचे जमादार सिद्धार्थ गायकवाड (५४) यांचाही कोरोनामुळे सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. त्यामुळे आयुक्तालयातील कोरोनामुळे मृतांची संख्या २१ वर पोहचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये एका निरीक्षकासह आठ पोलिसांना लागण झाल्यामुळे बाधित पोलिसांची संख्याही एक हजार ४०८ इतकी झाली आहे.
कोपरीचे हवालदार महाडीक यांना ४ आॅगस्ट रोजी सर्दी तापामुळे भिवंडी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ९ आॅगस्ट रोजी त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. हा अहवाल ११ आॅगस्ट रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना अ‍ॅव्हेन्यू या कोविड रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रेमडिसिविर इंजेक्शन देण्यात आले. ५ सप्टेंबर रोजी त्यांना प्लाझमा थेरपीही करण्यात आली. मात्र, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाला. कल्याणच्या आधारवाडी जेल रोड परिसरात राहणा-या गायकवाड यांना चार दिवसांपूर्वीच कल्याणच्या आयुष रु ग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान १४ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यु झाला.
* दरम्यान, गेल्या २४ तासांमध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील विठ्ठलवाडीचे निरीक्षक, चितळसरचे सहायक पोलीस निरीक्षक आणि मुख्यालयाचे उपनिरीक्षक असे तीन अधिकारी बाधित झाले. तर मानपाडयाचे दोन, नारपोली, भाईवाडा, महात्मा फुले येथील प्रत्येकी एकासह पाच कर्मचारी बाधित झाले. आतापर्यंत एक अधिकारी आणि २० कर्मचा-यांचा मृत्यु झाला असून दोन कोरोना संशयित पोलिसांचाही मृत्यु झाला आहे. तर १४४ अधिकारी आणि एक हजार २६४ कर्मचारी बाधित झाले. आतापर्यंत एक हजार २६८ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस