शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News:एसटीच्या ४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ठाण्यातील खोपट डेपो अखेर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 23:56 IST

वाहन परिक्षकांसह चालक आणि वाहक अशा तब्बल ४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे कर्मचा-यांच्या मागणीनंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी खोपट येथील एसटी डेपो क्रमांक एक हा सील करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ७ आणि ८ जुलै रोजी हा डेपो बंद राहणार असून या काळात याठिकाणी निर्जंतूकीकरण केले जाणार आहे.

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेच्या प्रवासी वाहतूकीवर परिणामाची शक्यतादोन दिवस राहणार बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य परिवहन सेवेतील (एसटी) वाहन परिक्षकांसह चालक आणि वाहक अशा तब्बल ४३ कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आल्यामुळे कर्मचाºयांच्या मागणीनंतर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी खोपट येथील एसटी डेपो क्रमांक एक हा सील करण्याचे आदेश दिले. त्यामुळे ७ आणि ८ जुलै रोजी हा डेपो संपूर्णपणे बंद राहणार असून या काळात याठिकाणी निर्जंतूकीकरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सार्वजनिक उपक्रमातील बससेवा बंद असल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांच्या वाहतूकीसाठी ठाण्यातील खोपट एसटी बस डेपो क्र मांक एक येथून या सेवेतील प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. यातूनच अनेक कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाली. डेपोतील विश्रांती कक्षातील अपुºया जागेमुळे सामाजिक अंतराचे पालन होणेही शक्य नव्हते. त्यामुळेच डेपो बंद ठेवून निर्जंतुकिकरण करण्याची मागणी कर्मचाºयांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार आणि बुधवार डेपो बंद ठेवण्यात येणार आहे. कर्मचाºयांच्या अनुपस्थितीमुळे अत्यावश्यक सेवेतील वाहतूकीवर परिणाम होण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. खोपट येथील एसटीच्या या डेपामधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी कल्याण, डोंबिवली, बदलापूर, दादर, मंत्रालय सीएसटी या भागांतील रुग्णालय तसेच इतर महत्वाच्या शासकीय कार्यालयांमध्ये जाणाºया प्रवाशांसाठी सेवा देण्याचे काम करीत आहे. आता या कर्मचाºयांनाही मोठया प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा डेपो सील करण्याची मागणी कर्मचाºयांकडून करण्यात आली. मात्र, एस.टी.प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाही. ठाणे जिल्हा इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर हा डेपो सील करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. त्यानुसार आता ७ आणि ८ जुलै रोजी हा डेपो बंद ठेवण्यात आला आहे. या दोन दिवसाच्या काळात संपूर्ण डेपोचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या ठाणे विभागीय कार्यालयाने दिली.

‘‘ या डेपोतून प्रतिदिन सकाळी ४० तर दुपारी ४० अशा ८० अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी बसेस सोडण्यात येत होत्या. या कर्मचा-यांची गैरसोय टाळण्यासाठी खोपट बस डेपो क्र मांक दोन आणि इतर ठिकाणांहून किमान ४० बसेस सोरण्यावर भर देण्यात येणार आहे. ’’
विनोद भालेराव, विभागीय नियंत्रक, ठाणे एसटी.
 

 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस