शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

CoronaVirus Lockdown News: हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2021 11:46 PM

मूक आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न : उपासमारीची वेळ

ठाणे : कोरोनाने ठाणे जिल्ह्याला घातलेल्या विळख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे हॉटेल, बार अँड रेस्टारंट चालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात हॉटेल मालकांना चांगलाच फटका बसला असून नवीन नियमावली आणि कडक निर्बंधावर मुूख्यमंत्र्यांनी ताेडगा काढावा अशी मागणी हॉटेल मालकांनी केली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाची वार्षिक फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आणि त्याशिवाय बार अँड रेस्टॉरंट चालविणे शक्य नसल्याने ठाण्यातील सर्वच बार अँड रेस्टाॅरंटमध्ये काही दिवसापूर्वी मद्यविक्री बंद केलेली होती. सरकारला महसूल हवा असल्यास त्यांनी सवलत द्यावी असा सूर ठाणे हॉटेल असोशिएशनने लावला आहे. यासाठी गुरुवारी ठाण्यात मूक आंदोलनही करण्यात आले.रात्री आठ वाजेपर्यंत पार्सल सर्व्हिससाठी उघडी असलेली हॉटेल सरसकट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या ठाण्यातील या व्यवसायातील सर्वांनीच एकत्र येऊन गुरुवारी मूक आंदोलन केले. लाखोंची कर्जे आणि मिळकत शून्य झाल्याने या व्यवसायाशी निगडित अनेकांनी एकत्र येऊन सरकारला निर्बंध शिथिल करण्याची विनंती केली. लवकरच हॉटेल उघडली नाहीत तर बायकामुलांना घेऊन आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.गावावरून नोकरीसाठीच आलो, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोक्यावर आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या नव्या नव्या नियमांमुळे हॉटेल, बार बंद पडले, आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली. उपासमारीच्या उंबरठ्यावर आलेल्या हॉटेल आणि बार मालकासह बारमधील हातावरचे पोट असलेले कर्मचारी यांनीही गुरूवारी मूक आंदोलन करून सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. मिशन बिगिन अगेन नंतर ब्रेक द चेन, माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी ब्रीदवाक्य सांगतात. परंतु माझे कुटुंब माझी जबाबदारी, मग सरकारची काही नैतिकता आहे की नाही असा सवाल आता कर्मचारी वर्गाने उपस्थित केला आहे.मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे, तीन प्रकारचे टॅक्स भरत आहोत, त्यानंतर आता पुन्हा मोठा भार डोक्यावर आला आहे. कामगारांना पगार, राहणे करीत आहोत. आम्ही देखील व्यावसायिक आहोत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर विचार करुन लवकरच तोडगा काढावा.    - चंद्रशेखर शेट्टी, ठाणे हॉटेल     असोसिएशन, उपाध्यक्ष

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे