CoronaVirus Lockdown News: हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 11:46 PM2021-04-08T23:46:48+5:302021-04-08T23:47:07+5:30

मूक आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न : उपासमारीची वेळ

CoronaVirus Lockdown News: Hoteliers call CM | CoronaVirus Lockdown News: हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

CoronaVirus Lockdown News: हॉटेल व्यावसायिकांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

googlenewsNext

ठाणे : कोरोनाने ठाणे जिल्ह्याला घातलेल्या विळख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे हॉटेल, बार अँड रेस्टारंट चालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या काळात हॉटेल मालकांना चांगलाच फटका बसला असून नवीन नियमावली आणि कडक निर्बंधावर मुूख्यमंत्र्यांनी ताेडगा काढावा अशी मागणी हॉटेल मालकांनी केली आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाची वार्षिक फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आणि त्याशिवाय बार अँड रेस्टॉरंट चालविणे शक्य नसल्याने ठाण्यातील सर्वच बार अँड रेस्टाॅरंटमध्ये काही दिवसापूर्वी मद्यविक्री बंद केलेली होती. सरकारला महसूल हवा असल्यास त्यांनी सवलत द्यावी असा सूर ठाणे हॉटेल असोशिएशनने लावला आहे. यासाठी गुरुवारी ठाण्यात मूक आंदोलनही करण्यात आले.

रात्री आठ वाजेपर्यंत पार्सल सर्व्हिससाठी उघडी असलेली हॉटेल सरसकट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या ठाण्यातील या व्यवसायातील सर्वांनीच एकत्र येऊन गुरुवारी मूक आंदोलन केले. 

लाखोंची कर्जे आणि मिळकत शून्य झाल्याने या व्यवसायाशी निगडित अनेकांनी एकत्र येऊन सरकारला निर्बंध शिथिल करण्याची विनंती केली. 
लवकरच हॉटेल उघडली नाहीत तर बायकामुलांना घेऊन आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

गावावरून नोकरीसाठीच आलो, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता आहे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च डोक्यावर आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या नव्या नव्या नियमांमुळे हॉटेल, बार बंद पडले, आता आमच्यावर उपासमारीची वेळ आली. 
उपासमारीच्या उंबरठ्यावर आलेल्या हॉटेल आणि बार मालकासह बारमधील हातावरचे पोट असलेले कर्मचारी यांनीही गुरूवारी मूक आंदोलन करून सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. मिशन बिगिन अगेन नंतर ब्रेक द चेन, माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी ब्रीदवाक्य सांगतात. परंतु माझे कुटुंब माझी जबाबदारी, मग सरकारची काही नैतिकता आहे की नाही असा सवाल आता कर्मचारी वर्गाने उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावे, तीन प्रकारचे टॅक्स भरत आहोत, त्यानंतर आता पुन्हा मोठा भार डोक्यावर आला आहे. कामगारांना पगार, राहणे करीत आहोत. आम्ही देखील व्यावसायिक आहोत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर विचार करुन लवकरच तोडगा काढावा.
    - चंद्रशेखर शेट्टी, ठाणे हॉटेल     असोसिएशन, उपाध्यक्ष

Web Title: CoronaVirus Lockdown News: Hoteliers call CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.