शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : ठाणे जिल्ह्यातील दहा रुग्णालयांसाठी खासदार कुमार केतकरांकडून अडीच कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 18:29 IST

Coronavirus in Thane : कोरोनाच्या या कालावधीतील रुग्णालयांच्या सुविधांचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. केतकर, यांनी त्यांच्या खासदारकीच्या निधीपैकी अडीच कोटींचा निधी जिल्ह्यातील या दहा रुग्णालयांसाठी दिला आहे.

ठाणे - येथील सिव्हिलसह जिल्ह्यातील ग्रामीण व उप जिल्हा रुग्णालये आदी आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये विविध सोयी, सुविधांची गरज आहे. (Coronavirus in Thane) याकडे लक्ष केंद्रित करून जिल्ह्यातील तब्बल दहा रुग्णालयांच्या सोयी, सुविधा, वैद्यकीय साहित्यांसाठी जेष्ठ पत्रकार व राज्यसभेचे खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar )  यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसे लेखी पत्रच त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे शुक्रवारी दिले. (Fund of Rs 2.5 crore from MP Kumar Ketkar for ten hospitals in Thane district)ठाणे जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये विविध सोयी, सुविधांची वानवा आहे. रुग्णालयाच्या या गरजां येथील संदीप आचार्य व विकास नाईक यांनी केतकर यांच्या निदर्शनात आणून दिला होत्या. कोरोनाच्या या कालावधीतील रुग्णालयांच्या सुविधांचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. केतकर, यांनी त्यांच्या खासदारकीच्या निधीपैकी अडीच कोटींचा निधी जिल्ह्यातील या दहा रुग्णालयांसाठी दिला आहे. याप्रमाणे अन्यही लोकप्रतिनिधींनी रुग्णालयांच्या कामांसाठी निधी देण्याची गरज असल्याचे खा. केतकर, यांनी या अर्थ सहाय्यातून उघड केले आहे. या निधीचे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देते वेळी दालना ठाणे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार उपस्थित होते.

अवघ्या‌ २५ लाखांचा निधी देण्याची तयारी खा. केतकर यांनी प्रारंभी दर्शवली होती. मात्र डॉ. पवार यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांच्या गरजा लक्षात घेऊन प्रस्ताव तयार केले आणि त्याकडे खा. केतकर, यांचे लक्ष वेधले असता त्यांनी अडीच कोटींचा निधी देण्याची सहमती दर्शवत तसे पत्रही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. कोरोना काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देणारे केतकर हे एकमेव खासदार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. अन्य खासदारांनीही आपला निधी करोनाच्या या कालावधीत सामाजिक बांधिलकी म्हणून दिला, तर राज्यातील शासनाच्या अनेक रुग्णालयांना मोठी मदत होईल, अशी अपेक्षा प्रशासकीय पातळीवर व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलthaneठाणे