शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या उपमहापौरपदासाठी जिल्हाध्यक्षांचे षड्यंत्र, नगरसेवकांचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 01:02 IST

काँग्रेस नगरसेविका जान्हवी पोटे यांना उपमहापौरपद मिळावे, यासाठी प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी षड्यंत्र केले आहे. तसेच माझी गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे

डोंबिवली : काँग्रेस नगरसेविका जान्हवी पोटे यांना उपमहापौरपद मिळावे, यासाठी प्रभारी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी षड्यंत्र केले आहे. तसेच माझी गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे, असे भासवून सगळ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप ज्येष्ठ नगरसेवक नंदू म्हात्रे यांनी पोटे यांच्यावर केला. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच नाही. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या पत्रामध्येही तसा कुठेही उल्लेख नसल्याचे ते म्हणाले.कल्याण येथे महापालिकेत पक्ष गटनेत्यांच्या कार्यालयात म्हात्रे यांनी शुक्रवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यावेळी नगरसेविका हर्षदा भोईर, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र भोईर, ब्लॉक अध्यक्ष सदाशिव शेलार, माजी नगरसेवक नवीन सिंग आदी उपस्थित होते. दर्शना भोईर यांची इच्छा नसतानाही वरिष्ठांकडून त्यांच्या नावे गटनेतेपद स्वीकारण्याचे पत्र पोटे यांनी आणले. खरेतर, त्यासंदर्भात सदाशिव शेलार यांनी आधीच वरिष्ठांना पत्र देत या निर्णयासंदर्भात तूर्तास स्थगिती देण्याचे पत्र आणले होते, असेही म्हात्रे यांनी पत्रकात म्हटले आहे.स्थायी सभापती निवडीवरून जो गोंधळ निर्माण झाला आहे, त्यासाठी आम्ही प्रदेशाध्यक्षांची वेळ मागितली आहे. आम्ही त्यांच्याकडे वस्तुस्थिती मांडणार आहोत, असे म्हात्रे म्हणाले. सिंग यांनी मात्र पुन्हा पोटे यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घ्यावे आणि त्या जागी सगळ्यांना घेऊन जाणाऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीला संधी द्यावी. डोंबिवलीकरांना ती संधी दिल्यास निश्चितच केडीएमसीच्या निवडणुकीमध्ये वेगळे चित्र दिसून येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.माझी पत्नी व नगरसेविका जान्हवी पोटे यांना उपमहापौरपद मिळावे, यासाठी मी षड्यंत्र केले, हा आरोप बिनबुडाचा आहे. त्याकडे मी लक्ष देत नाही. पण, महाविकास आघाडीला मतदान न करता भाजपला साथ देणाऱ्यांवर पक्षाने कारवाई केली आहे, ती योग्य आहे. त्यामुळे मी दिशाभूल केली, ही टीका करणे उचित नाही. मला जर उपमहापौर करायचे असते, तर मी गटनेतेच केले असते. अजून कशात काही नाही आणि आरोप सुरू झाले आहेत, ते योग्य नाही.- सचिन पोटे, कल्याण जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

टॅग्स :congressकाँग्रेसkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाPoliticsराजकारण