शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिकांचे पाणी महागले

By admin | Updated: February 19, 2016 02:26 IST

एकीकडे अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे भीषण पाणीटंचाई भेडसावत असताना दुसरीकडे व्यावसायिकांच्या पाणीदरात वाढ करण्याच्याप्रस्तावाला गुरुवारी कल्याण-डोंबिवलीच्या स्थायी समितीने मान्यता दिली.

कल्याण : एकीकडे अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे भीषण पाणीटंचाई भेडसावत असताना दुसरीकडे व्यावसायिकांच्या पाणीदरात वाढ करण्याच्याप्रस्तावाला गुरुवारी कल्याण-डोंबिवलीच्या स्थायी समितीने मान्यता दिली. घरगुती दरवाढ झाली नसली तरी जादा पाण्याचा वापर केल्यासही ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव शनिवारच्या महासभेत सादर केला जाणार आहे.केडीएमसी क्षेत्रात प्रतिदिन सरासरी ३०० द.ल. लीटर पाणीपुरवठा केला जातो. बारावे व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांव्यतिरिक्त जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मोहिली आणि नेतिवली येथे जलशुद्धीकरण केंद्रासाठी झालेला खर्च आणि पाणीपुरवठ्यात झालेली वाढ, त्याचबरोबर विद्युतदेयके, देखभाल दुरुस्ती, लागणारी रसायने, पाण्याची रॉयल्टी आदी खर्चांत वाढ झाली आहे. त्याचबरोबर दैनंदिन देखभाल दुरुस्तीचा खर्च आणि घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी उत्पन्नात वाढ होणे आवश्यक असल्याचे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. घरगुती ग्राहकांच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. जर, त्यांनी जादा पाणी वापरले तरच त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. त्यामुळे यातून पाण्याचा अतिरिक्त वापर टाळला जाईल आणि पाण्याची बचत होईल, याकडे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी लक्ष वेधले. काही सदस्यांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. परंतु, चर्चेअंती प्रशासनाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. साधारणपणे घरगुती ग्राहकांना ५०० लीटर पाण्यासाठी प्रतिघनमीटर ७ रुपये दर आकारला जातो.