शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

टिटवाळा येथे रेल्वे रुळांजवळ आढळला बेपत्ता सीएचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 09:29 IST

टिटवाळा रेल्वे रुळांजवळ एका व्यक्तीचा मृतदेह १२ आॅक्टोबरला आढळला होता. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

कल्याण : आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असलेल्या ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्स’ या कंपनीच्या सीएचा मृतदेह टिटवाळा येथे रुळांजवळ आढळून आला आहे. सागर सुहास देशपांडे असे त्यांचे नाव असून, ते ठाण्याला राहत होते. ११ आॅक्टोबरपासून ते बेपत्ता होते. दरम्यान, त्यांचा मृतदेह रेल्वेरुळांजवळ आढळल्याने त्यांनी आत्महत्या केली का? ही दुर्घटना आहे की घातपात, या तिहेरी अंगाने कल्याणरेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टिटवाळा रेल्वे रुळांजवळ एका व्यक्तीचा मृतदेह १२ आॅक्टोबरला आढळला होता. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. या प्रकरणाचा त्यांनी तपास सुरू केला होता. या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्यांनी मृतदेहाचे फोटो सगळीकडे पाठविले होते. अखेर, पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. 

दरम्यान, सागर हे ‘कॉक्स अ‍ॅण्ड किंग्स’ या कंपनीचे सीए होते. ११ आॅक्टोबरला टिटवाळ्याला जात असल्याचे त्यांनी त्यांच्या घरी सांगितले. ते तेव्हा घराबाहेर पडले, ते पुन्हा घरी परतलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली होती.

टॅग्स :kalyanकल्याणrailwayरेल्वेDeathमृत्यूchartered accountantसीए