शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
4
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
5
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
6
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
7
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
8
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
9
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
10
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
11
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
12
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
13
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
14
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
15
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
16
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
17
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
18
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
19
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
20
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
Daily Top 2Weekly Top 5

खडवलीच्या भातसा नदीत बुडालेल्या दोन युवकांचे मृतदेह सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 20:09 IST

मध्य रेल्वेच्या कल्याण- कसारा मार्गावर असलेल्या खडवली रेल्वे स्थानका नजीकच्या भातसा नदीवर पिकनिक पाॅईंटवर पिकनिक करण्यासाठी मुंबई वरून आलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या दरम्यान घडली होती.

टिटवाळा: मध्य रेल्वेच्या कल्याण- कसारा मार्गावर असलेल्या खडवली रेल्वे स्थानका नजीकच्या भातसा नदीवर पिकनिक पाॅईंटवर पिकनिक करण्यासाठी मुंबई वरून आलेले दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या दरम्यान घडली होती. यातील बुडालेल्या युवकांचे मृतदेह शुक्रवार २२ नोव्हेंबर रोजी हाती लागले आहेत.  

मुंबईतील वडाळा परिसरातील राहणारे आणि मुंबई येथील आय .टी.आय . कॉलेजचे विद्यार्थी  असलेल्या मित्रांचा गुप्र  खडवली येथील भातसा नदीच्या ठिकाणी  गुरुवारी दुपारी पिकनिकसाठी  आले होते. यावेळी  दीड वाजण्याच्या सुमारास ते भातसा नदीत  पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता  दोन तरुणांना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. गुरुवारी दिवसभर आणि संध्याकाळी शोध घेऊनही त्यांचे मृतदेह हाती लागले नव्हते.

मात्र शुक्रवारी सकाळी पुन्हा त्यांचा स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि त्यांना सहकार्य करणारे बॉर्डर सेक्युरिटी सर्विसची टीम यांच्या मदतीने  शोध घेत असताना सकाळी ११:३० च्या दरम्यान कुष्णा उर्फ  श्रीधर धरणे (१९ ) याचा मृतदेह हाती लागला तर अक्षय गोकुळ भरमे वय २१वर्षे याचा मृतदेह सायंकाळी ४: ३० च्या दरम्यान सापडला आहे. हे मृतदेह शोधण्याकामी गोताखोर स्थानिक युवक गोरख वाघे यांनी अथक परिश्रम घेत हे मृतदेह शोधून काढले. सदर मृतदेह उल्हासनगर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस