तेनेरिफ (स्पेन): 'हंटाव्हायरस' या जीवघेण्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे चर्चेत आलेले नेदरलँडचे 'एमव्ही होंडियस' हे क्रूझ जहाज रविवारी पहाटे कॅनरी बेटांवरील तेनेरिफ बंदरात पोहोचणार आहे.
जहाजावरील १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक गेब्रेयसस स्वतः स्पेनमध्ये दाखल झाले आहेत.
जहाज बंदरात पोहोचल्यानंतर प्रवाशांना पूर्णपणे वेगळ्या भागात नेले जाईल. ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसत नाहीत, त्यांना सहा आठवड्यांसाठी होम क्वॉरंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.
'घाबरू नका हा कोविड नाही'
हंटाव्हायरस सामान्यतः उंदरांच्या विष्ठेच्या संपर्कात आल्याने किंवा श्वासाद्वारे पसरतो. मानवाकडून मानवाकडे याचा प्रसार होणे दुर्मीळ असले, तरी या जहाजावर आढळलेला 'अँडीज व्हायरस' हा प्रकार एकमेकांपासून पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मात्र, 'हा नवीन कोविड नाही आणि जागतिक स्तरावर याचा धोका सध्या कमी आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ने स्पष्ट केले आहे.
Web Summary : A cruise ship with over 140 people affected by Hantavirus is set to arrive in Spain. WHO officials are present to oversee safe disembarkation and quarantine procedures. While generally spread by rodents, the specific virus type raises concerns about human-to-human transmission, though WHO assures it's not a new COVID and global risk is low.
Web Summary : हंटावायरस से प्रभावित 140 से अधिक लोगों वाला एक क्रूज जहाज स्पेन पहुंचने वाला है। सुरक्षित उतारने और क्वारंटाइन प्रक्रियाओं की निगरानी के लिए डब्ल्यूएचओ के अधिकारी मौजूद हैं। चूहों से फैलने वाला वायरस मानव संचरण का खतरा पैदा करता है, हालांकि डब्ल्यूएचओ ने इसे नया कोविड नहीं बताया।