Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 07:14 IST

संचालकांनी मोठ्या प्रमाणावर पैशांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एडीए समूहाशी संबंधित मुंबईतील १७ ठिकाणांवर सीबीआयने शनिवारी छापेमारी केली. बैंक फसवणूक आणि निधी वळवणुकीच्या आरोपांप्रकरणी ही कारवाई केली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ८ मे रोजी जारी केलेल्या सर्च वॉरंटच्या आधारे ही करण्यात आली.

रिलायन्स टेलिकॉम लिमिटेड, रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आणि रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड या कंपन्या तसेच त्यांच्या संचालकांविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कंपन्यांच्या संचालकांच्या निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली. 

या संचालकांनी मोठ्या प्रमाणावर पैशांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या छापेमारीदरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच, तपासादरम्यान काही मध्यस्थ कंपन्या एकाच पत्त्यावरून कार्यरत असल्याचेही समोर आले आहे. 

आतापर्यंत या प्रकरणी सीबीआयने अंबानी यांच्या कंपन्यांच्या विरोधात एकूण सात गुन्हे दाखल केले असून त्यांच्यावर सुमारे २७,३३७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप आहे. ईडीचे अधिकारी देखील या प्रकरणांचा समांतर तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : CBI raids Anil Ambani's ADA group over bank fraud.

Web Summary : CBI raided 17 locations linked to Anil Ambani's Reliance ADA Group in Mumbai over bank fraud and fund diversion allegations. Raids, based on a search warrant, targeted Reliance Telecom, Reliance Commercial Finance, and Reliance Home Finance, uncovering significant financial irregularities. CBI has filed seven cases against the group for alleged ₹27,337 crore fraud.
टॅग्स :अनिल अंबानीसीबीआयधोकेबाजी