शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या भूमिकेमुळे भाजपा विरोधकांना बळ

By admin | Updated: May 13, 2017 00:48 IST

पंजाबचा दाखला देत भाजपा दरवेळी जिंकू शकत नाही, असे सांगत धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र येण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : पंजाबचा दाखला देत भाजपा दरवेळी जिंकू शकत नाही, असे सांगत धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र येण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या आवाहनामुळे भाजपा विरोधकांना बळ चढले आहे. त्याचबरोबर मुस्लिमांनी भाजपाला मते दिल्याचा प्रचार खोटा असल्याचे सांगत पवार यांनी त्या समाजाचा पाठिंबा अद्यापही धर्मनिरपेक्ष गटांना असल्याचे दाखवून दिल्याने राष्ट्रवादी, समाजवादी पक्षासह काँग्रेसला भिवंडीच्या निवडणुकीत त्याचा फायदा मिळू शकतो, असा दावाही त्या पक्षाचे नेते खाजगीत करत आहेत. अन्य पक्षांतून उमेदवार फोडून आपली स्वतंत्र आघाडी तयार करण्याचे भाजपाचे प्रयत्न भिवंडीत फसले. त्यामुळे त्यांनी कोणार्क आघाडीशी समझोता केला. पण जो काँग्रेस पक्ष कमकुवत होईल, अशी भाजपाची अपेक्षा होेती त्याच पक्षाने असंतुष्टांना सांभाळण्याची कसरत यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळे अपेक्षेपेक्षाही अधिक भक्कमपणे तो पक्ष निवडणुकीत उभा राहिला. शिवाय समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीतील मतभेद दूर करून त्यांची आघाडी करण्यात यश मिळाल्याने या पक्षातील मतांच्या फाटाफुटीचे प्रमाण रोखण्यात यश आले. त्यामुळे धर्म निरपेक्ष आघाडी जरी उभी राहू शकली नसली, तरी भाजपाविरोधात, प्रसंगी त्यांनी समझोता केलेल्या कोणार्कविरोधात उभे राहणे इतर पक्षांना शक्य झाले. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, काँग्रेस एकत्र आले. पण समाजवादी पक्षातील फाटाफूट, विसविशीत काँग्रेस पक्षामुळे त्या आघाडीला यश मिळाले नाही, याकडे लक्ष वेधत पवार यांनी ते पक्ष राज्यात चांगली कामगिरी करतील, असेच अप्रत्यक्ष सूचित केले.