शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंभोवती रचला चक्रव्यूह; प्रश्नांची सरबत्ती आणि निधीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 07:15 IST

जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व आपल्याला मिळावे, यासाठी भाजप आग्रही होता. मात्र, अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठाण्याचे पालकत्व आले.

लोकमत न्यूज नेटवर्क , ठाणे : ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरुद्ध भाजपचे आमदार असा राजकीय सामना रंगल्याचे चित्र दिसून आले. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील पहिल्याच बैठकीत भाजपच्या आमदारांनी निधी आणि समस्यांचा पाढा वाचत शिंदे यांना चक्रव्यूहात खेचण्याचा प्रयत्न केला. बैठकीच्या उत्तरार्धात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बैठकीला हजर झाले व त्यांनी शिंदेसेनेच्यावतीने किल्ला लढवला.

लवकरच वाढीव निधीचा विचारठाणे जिल्ह्यात भाजपने १०० टक्के यश मिळविले असून, त्यांचे नऊ आमदार आहेत तर शिंदेसेनेचे सहा आमदार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याने ठाणे जिल्ह्याचे पालकत्व आपल्याला मिळावे, यासाठी भाजप आग्रही होता. मात्र, अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडेच ठाण्याचे पालकत्व आले. त्यामुळे भाजपमधील आमदार, नेते काहीसे नाराज आहेत. 

बुधवारी झालेल्या पहिल्यावहिल्या बैठकीत आ. किसन कथोरे यांनी पर्यटनासाठी १० लाखांचा निधी देणार असाल तर देऊच नका, असा पवित्रा घेतला. विकासासाठी निधी वाढवून मिळावा, अशी मागणी भाजपच्या आमदारांनी लावून धरली.  राज्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यायचा असल्याने थोडे सबुरीने घ्या, असा सल्ला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. मात्र, विकासकामे करण्यासाठी निधी आवश्यक असून, तो मिळावा यासाठी भाजपचे आमदार अडून बसल्याचे चित्र दिसले. अखेरीस शासनस्तरावर बैठक घेऊन लवकरच वाढीव निधीचा विचार केला जाईल, असे सूतोवाच शिंदे यांना करावे लागले. 

शिंदेसेनेच्या तीन आमदारांची दांडी समितीची बैठक सुरू होताच भाजपचे किसन कथोरे, रवींद्र चव्हाण, नरेंद्र मेहता, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड या आमदारांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.  त्यांना उत्तरे देण्यात किंवा कुरघोडी करण्यात शिंदेसेनेचे आमदार कमी पडल्याचे दिसत होते. शिंदेसेनेच्या तीन आमदारांनी बैठकीला दांडी मारली होती.  बैठक संपत असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हजर झाले. सरनाईक यांनी भाजपच्या सदस्यांना तोंड दिले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाthaneठाणे