Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा दणका! 'हम मुंब्रा को हरा बना देंगे' म्हणणाऱ्या सहर शेख यांनी मागितली माफी, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 13:01 IST2026-01-24T13:00:33+5:302026-01-24T13:01:05+5:30

BJP Kirit Somaiya Tweet And AIMIM Sahar Shaikh : किरीट सोमय्या यांच्या दणक्यानंतर आता सहर शेख यांनी माफी मागितली आहे. 

BJP Kirit Somaiya Tweet Over AIMIM Sahar Shaikh apologize for her statement of green mumbra | Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा दणका! 'हम मुंब्रा को हरा बना देंगे' म्हणणाऱ्या सहर शेख यांनी मागितली माफी, म्हणाल्या...

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा दणका! 'हम मुंब्रा को हरा बना देंगे' म्हणणाऱ्या सहर शेख यांनी मागितली माफी, म्हणाल्या...

मुंब्रा येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवक सहर युनूस शेख यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. या विधानाच्या निषेधार्थ भाजपा नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. सोमय्या यांच्या दणक्यानंतर आता सहर शेख यांनी माफी मागितली आहे. 

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. "सहर शेखचा "माफीनामा". AIMIM ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा सहर शेखनी हिंदुना चिथावणी देणाऱ्या "हम मुंब्रा को हरा बना देंगे"  या वक्तव्याबद्दल माफी मागितली. मुंब्रा पोलिसांनी माझ्या तक्रारीनंतर सहर शेखला नोटीस पाठवली होती. मी आज पाठपुराव्यासाठी मुंब्रा पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळी ही माहिती मला लिखित स्वरूपात दिली" असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. 

सहर शेख यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे. यामध्ये त्यांनी मुंब्रा येथे झालेल्या सभेत "हम मुंब्रा को हरा बना देंगे" असं भाषण केलं होतं. पण हे वाक्य पक्षाचा झेंडा आणि निशाणी संदर्भात बोलल्याचं सांगितलं. "कोणाचंही मन दुखावण्याचा किंवा वातावरण खराब करण्याचा हेतू नव्हता. आम्ही तिरंग्यासाठी जगू आणि तिरंग्यासाठीच मरू. वक्तव्यामुळे कोणाचंही मन दुखावलं असेल तर मी जाहीरपणे माफी मागते" असं सहर शेख यांनी आपल्या लेखी जबाबात लिहून दिलं आहे. 

किरीट सोमय्या यांनी सहर शेख यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ पोलिसांना दाखवत औपचारिक तक्रार नोंदवली होती. सोमय्या यांनी "पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये सहर शेख यांनी भविष्यात वृक्षलागवड करून मुंब्रा हिरवे करण्याचे विधान केल्याचा उल्लेख आहे. पण प्रत्यक्ष भाषणात कुठेही वृक्ष किंवा झाडे लावण्याचा उल्लेख नसल्याचा" दावा केला. उलट भाषणादरम्यान मुंब्रा येथील २० टक्के हिंदू बांधवांविरोधात धमकीची भाषा वापरण्यात आली असून, “त्यांना संपवण्यासारखे” गंभीर वक्तव्य केल्याचा आरोप सोमय्या केला होता. तसेच या वक्तव्यामुळे सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो, असं सांगत सहर शेख यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी पोलिसांकडे केली होती. 

Web Title : किरीट सोमैया का दबाव: 'मुंब्रा को हरा' कहने पर सहर शेख ने मांगी माफी

Web Summary : किरीट सोमैया की शिकायत के बाद, AIMIM पार्षद सहर शेख ने मुंब्रा को हरा बनाने के बारे में अपने विवादास्पद बयान के लिए माफी मांगी। उन्होंने दावा किया कि यह पार्टी के झंडे को संदर्भित करता है, न कि धार्मिक रूपांतरण को, और अगर इससे किसी को ठेस पहुंची तो अफसोस जताया।

Web Title : Kirit Somaiya's pressure: Sahar Shaikh apologizes for 'Green Mumbra' remark.

Web Summary : Following Kirit Somaiya's complaint, AIMIM corporator Sahar Shaikh apologized for her controversial statement about turning Mumbra green. She claimed it referred to the party flag, not religious conversion, and expressed regret if it offended anyone.