शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी सज्ज राहा; सर्व यंत्रणांना ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश

By सुरेश लोखंडे | Updated: May 11, 2026 16:16 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत त्यांनी आज विविध विभागांच्या तयारीची सविस्तर समीक्षा केली.

सुरेश लोखंडे, ठाणे : आगामी मान्सून काळात कोणतीही जीवितहानी अथवा मोठी दुर्घटना होऊ नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने आणि युद्धपातळीवर पूर्वतयारी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत त्यांनी आज विविध विभागांच्या तयारीची सविस्तर समीक्षा केली.

यावेळी डॉ. पांचाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला धोकादायक पूल, साकव आणि जुन्या इमारतींचे तातडीने संरचनात्मक ऑडिट करण्याचे आदेश दिले. जलसंपदा विभागाने धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा, तर राष्ट्रीय महामार्ग विभागाने दरडप्रवण घाटांमध्ये जेसीबी, पोकलेन आणि डंपर कायमस्वरूपी तैनात ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची तत्परता तपासण्यासाठी पोलीस, अग्निशमन आणि आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यात रंगीत तालीम आयोजित करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. साथीचे रोग रोखण्यासाठी औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले. 

दरडप्रवण गावे, पूरस्थिती, नदीपात्रातील गाळ काढणे, औद्योगिक सुरक्षाव्यवस्था आणि बचाव साहित्याची उपलब्धता यांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक साधनसामुग्री खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मदत उपलब्ध करून दिली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Be prepared for monsoon: Thane Collector's strict instructions to all systems.

Web Summary : Thane administration gears up for monsoon. Collector orders structural audits of bridges, deployment of machinery in ghats, mock drills, and stocking of medicines to prevent disasters and disease outbreaks. Funds allocated for disaster management equipment.
टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका