शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दहा शहरांत आरटीओची स्वयंचलित तपासणी केंद्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 03:56 IST

१३६.३३ कोटींचा निधी मंजूर; ठाणे, कल्याण, ताडदेवसह पनवेलचा समावेश

- नारायण जाधव ठाणे : वाढत्या नागरीकरणामुळे महाराष्ट्राची लोकसंख्या ज्या गतीने वाढत आहे, त्याच गतीने वाहनांची संख्याही मोठ्या संख्येने वाढत आहे. आयटी पार्कच्या जाळ्यामुळे दुचाकींसह चार चाकी तर विमानतळे, मेट्रो, समृद्धी महामार्ग, विविध कॉरिडोर आणि टाउनशिपमुळे अवजड वाहनांच्या संख्येत भर पडत आहे.राज्यात जी काही आरटीओ कार्यालये आहेत, त्यांच्याकडे वाहन परीक्षण-निरीक्षणआणि स्वयंचलित तपासणी केंदे्र नाहीत. याबाबत दाखल एका जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर आता चार वर्षांनंतर गृह विभागाने १० शहरांत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रे स्थापन करण्यासाठी १३६ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या १० शहरांमध्ये मर्फी-ठाणे, नांदिवली-कल्याण, ताडदेव-मुंबई, तळोजा-पनवेल, नागपूरचे हिंगणा, पिंपरी-चिंचवडसाठी भोसरी, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती या १० शहरांत स्वयंचलित वाहन तपासणीसह वाहन परीक्षण-केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर केंद्रांमध्ये प्रशासकीय इमारतींसह वाहन तपासणीसाठी चार लेनच्या धावपट्ट्या, डीजी सेटसह तत्सम यंत्रसामग्रीचा समावेश राहणार आहे. यासाठी स्वमालकीची जागा असणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाची जागा असल्यास त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र बंधनकारक आहे.फिटनेस प्रमाणपत्रांना येणार गतीराज्यात वाहनांची संख्या वाढत असली, तरी ज्या गतीने त्यांना वाहन सुयोग्य आहे किंवा नाही, यासाठी जे फिटनेस प्रमाणपत्र लागते, ते देण्यात या वाहन परीक्षण-निरीक्षणआणि स्वयंचलित तपासणी केंद्राअभावी गती मिळत नव्हती.यामुळे अनेकदा नादुरुस्त वाहनेही रस्त्यावर धावून अपघातांना निमंत्रण मिळत होते. परंतु, निधी मंजूर झाल्याने या कामांस गती मिळून आरटीओची डोकेदुखी दूर होणार आहे. शिवाय, वाहन परवान्यांनाही गती मिळणार आहे.अधिकाऱ्यांना केले होते निलंबितफिटनेस प्रमाणपत्रांना गती मिळत नसल्याने मागे महाराष्ट्र शासनाने कोणताही दोष नसतानाही राज्यातील अनेक आरटीओ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. मात्र, आपली चूक लक्षात आल्यानंतर शासनाने तो निर्णय मागे घेतला होता. आता तीच चूक सुधारण्यासाठी हा निधी मंजूर केला आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस