शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

घोडबंदरच्या सेवा रस्त्यांचे डांबरीकरण; ठामपाचा निर्णय, कोंडीतून सुटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 01:03 IST

काही दिवसांपूर्वी खासदार राजन विचारे यांनी पाहणी करून सेवा रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

ठाणे : मेट्रोच्या कामामुळे, विविध वाहिन्या टाकण्याच्या कामामुळे घोडबंदर भागातील सेवा रस्त्यांची अवस्था दयनीय झाली होती. त्यातही मेट्रोचे काम सुरू असल्याने येथे वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे येथील मुल्लाबाग ते नागला बंदरपर्यंतच्या दोन्ही बाजूंच्या १५ किमी सेवा रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले असून, 

यावर २३ कोटींचा खर्च होणार आहे. यातील दीड किमीचे काम वगळता उर्वरित काम मेअखेर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. घोडबंदर रोडवर मेट्रोचे काम सुरू असतानाच येथील सेवा रस्त्यांच्या ठिकाणी गटार, जलवाहिनी टाकण्याचे कामदेखील महापालिकने सुरू केले. त्यानंतर या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी केली. परंतु, पावसाळ्यात पुन्हा त्यांची चाळण झाली. यामुळे वाहनचालकांना या रस्त्यांचा पर्यायही अपुरा पडत होता. काही दिवसांपूर्वी खासदार राजन विचारे यांनी पाहणी करून सेवा रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या निर्देशानुसार आठ दिवसांपासून या सेवा रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. येत्या दोन वर्षांत ते काम पूर्ण होणार आहे. परंतु, ज्या ठिकाणी ड्रेनेज वाहिन्या टाकण्याचे काम शिल्लक आहे, ज्या ठिकाणी एमटीएनएलने खोदकाम केले आहे, ते काम नंतर करण्यात येणार असून उर्वरित रस्त्याचे काम मेअखेर पूर्ण करण्यात येणार असल्याचे नगर अभियंता रवींद्र खडताळे म्हणाले.

२०१२ चा पुन्हा डांबरीकरणाचा प्रयोग घोडंबदर सेवा रस्त्याचे ज्या पद्धतीने डांबरीकरण करण्यात येत आहे, ती पद्धत २०१२ मध्येही अवलंबिली होती. कॅडबरी सेवा रस्ता, तसेच इतर काही रस्त्यांची कामे यानुसार केली होती. बीबीएम पद्धतीने हे डांबरीकरण केले होते. हे रस्ते आजही चांगल्या स्थितीत आहेत. त्यानुसार आता या सेवा रस्त्यांचे कामही करण्यात येत असून त्यांचे आयुर्मान तीन वर्षांचे धरले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका