शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

परराज्यांंतील प्रवाशांच्या ॲण्टीजेन टेस्ट; तीन महिन्यांंत ६० हजार टेस्ट, अवघ्या ९४१ प्रवाशांना लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2020 7:22 AM

CoronaVirus News in Thane : ठाणे शहरात मार्चअखेरीस कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान प्रतिदिन ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते.

ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांच्या ॲण्टीजेन टेस्ट ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर ऑगस्ट महिन्यापासून करण्यास सुरुवात केली. तीन महिन्यांत ६० हजार प्रवाशांच्या टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ९४१ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. या प्रवाशांवर तत्काळ उपचार केल्याने धोका टाळण्यास मदत झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.ठाणे शहरात मार्चअखेरीस कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान प्रतिदिन ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना केल्याने हळूहळू शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. अशातच शासनाने वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर परराज्यांतील नागरिक पुन्हा मुंबई, ठाण्यात येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला या नागरिकांची चाचणी करण्यात येत नव्हती. त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत, ठाणे महापालिका प्रशासनाकडून परराज्यांतून येणाऱ्या नागरिकांच्या ॲण्टीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ऑगस्ट महिन्यापासून या टेस्टला सुरुवात करण्यात आली. यासाठी ३५ जणांचे पथक कार्यरत आहे. यावेळी परराज्यांतून येणाऱ्या प्रतिदिन सुमारे ८०० ते ९०० जणांची टेस्ट करण्यात येत आहे. त्यानुसार, मागील तीन महिन्यांत ६० हजार ३५३ टेस्ट करण्यात आल्या. बाधित रुग्णांवर शहरातील विविध शासकीय खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत.

केडीएमसीची रुग्णसंख्या दोन आकड्यांत कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी प्रथमच दोन आकड्यांत म्हणजे ८८ एवढी आली. एकूण रुग्णांची संख्या ५० हजार २८२ वर पोहोचली आहे. २४ तासांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण एक हजार आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ५२७ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे