शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

४४८ पाड्यांत तीव्र टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 7:16 AM

उन्हाची काहिली जाणवू लागताच ठाणे जिल्ह्यातील ४४८ गावपाड्यांना यंदाही तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या हाती आली आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी साडेसहा कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.

- सुरेश लोखंडे ठाणे - उन्हाची काहिली जाणवू लागताच ठाणे जिल्ह्यातील ४४८ गावपाड्यांना यंदाही तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या हाती आली आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी साडेसहा कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस पडला. त्यामुळे महापालिकांसह नगरपालिकांची पाणीकपातीतून काही अंशी सुटका झाली. मात्र मागील अनुभव लक्षात घेता यंदाही १२१ मोठी गावे व ३२७ पाड्यांना टंचाईला तोंड द्यावे लागणार, असे ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वेक्षणांती उघडकीस आले. अंबरनाथ, कल्याण या शहरी तालुक्यांसह भिवंडी, मुरबाड आणि तलावांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाºया शहापूरच्या सर्वाधिक गावांना टंचाई भेडसावणार आहे.शहापूरच्या १६ गावांसह ५८ आदिवासी पाड्यांना मागील वर्षी १८ टँकरव्दारे पाणीपुरवठा झाला. मुरबाडच्या चार गावपाड्यांना तीन टँकरने गेल्यावर्षी पाणीपुरवठा केला. या उन्हाळ्यात मात्र शहापूरची ७८ गावे, १९० पाड्यांना पाणीटंचाई भासेल, तर मुरबाडची २४ गावे- ६५ पाडे, भिवंडीची दोन गावे- ३८ पाडे, कल्याणची १० गावे- १७ पाडे आणि अंबरनाथमधील सात गावे व १७ पाड्यांना पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता सर्व्हेअंती निश्चित करण्यात आली. शहापूरच्या ५३ गावांसह १४१ पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होणार असून त्यासाठी ९० लाखांची तरतूद केली आहे, तर मुरबाडचे १४ गावे आणि ३० पाड्यांसाठी १९ लाख खर्चून टँकरव्दारे पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.जुन्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी दोन कोटी १७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून दहा गावे आणि ११ पाड्यांच्या योजना दुरूस्त होतील. शहापूर तालुक्यात खर्डी येथील दोन कोटींच्या पूरक नळ पाणीपुरवठा योजनेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही तालुक्यास योजना मंजूर केलेली नाही.नव्या विंधन विहिरीटंचाईच्या या काळात यंदा तलावातील गाळ काढण्याचे नियोजन नाही. तसेच विहिरीही खोल केल्या जाणार नाहीत. पण एक कोटी ७० लाख खर्च करून ३८ गावे आणि १२९ आदिवासी पाड्यांसाठी नवीन विंधन विहिरी घेतल्या जातील.असा होईल खर्च : सर्वाधिक शहापूर तालुक्यात चार कोटी ११ लाख, मुरबाडला ७३ लाख ६० हजार रूपये, भिवंडीसाठी २६ लाख, कल्याणसाठी ५१ लाख आणि अंबरनाथसाठी ८७ लाख २० हजार रूपयांच्या खर्चाची तजवीज करण्यात आली आहे.

टॅग्स :Waterपाणी