शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांत पालकमंत्र्यांची परीक्षा तर समितीची कसोटी

By admin | Updated: October 30, 2015 23:52 IST

कल्याण-डोंबिवली मनपाच्या पाचव्या सार्वजनिक निवडणुकीत २७ गावांचा विषय निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला अन् गाजला. येथे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनपा, आरपीआय

अरविंद म्हात्रे, चिकणघरकल्याण-डोंबिवली मनपाच्या पाचव्या सार्वजनिक निवडणुकीत २७ गावांचा विषय निवडणुकीचा केंद्रबिंदू राहिला अन् गाजला. येथे भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनपा, आरपीआय, सपा, बसपा अशा सर्वपक्षीयांचे नेतृत्व करणारी संघर्ष समिती आणि शिवसेना यांच्यात फेस टू फेस सामना रंगला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३२ वर्षांचा बहिष्कार फोडल्याचा राग धरून संघर्ष समिती चवताळल्यागत शिवसेनेला शह देण्यासाठी शड्डू ठोकून रिंगणात उतरल्याने ही निवडणूक खूपच चुरशीची झाली आहे. यामुळे पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे. तर, संघर्ष समितीचीही कसोटी लागलेली आहे.मुख्यमंत्र्यांसह मंत्री,आमदार, खासदार यांनी २७ गावांत हजेरी लावून समितीच्या पाठीशी सरकार असल्याची ग्वाही दिली. यामुळे २७ गावे समिती बळकट झाली असली तरी खुद्द पालकमंत्री रात्री २७ गावांत घरोघरी प्रचारास फिरल्याने शिवसेनेतही उत्साह बघायला मिळाला. त्यांनी नियोजनबद्ध प्रचार केला. तर, संघर्ष समितीने प्रचारात त्यांनाच टार्गेट करून भूमिपुत्रांच्या हिताआड आल्याचा आरोप केला. यामुळे २७ गावांचा प्रचारही आज (३० आॅक्टो.) संपला असून समितीने घरोघरी जाऊन मतदारांना शिवसेनेने २७ गावांना वेठीस धरल्याचा प्रचार केला. संघर्ष समितीला राजकीय लाभ देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांवर लक्ष केंद्रित केले आहे. समितीच्या प्रचारामुळे पालकमंत्र्यांना २७ गावांत घरोघरी मते मागण्यासाठी जावे लागले. येथे शिवसेनेची एक उमेदवार आधी बिनविरोध आलेली आहे. गेल्या ३२ वर्षांपासून २७ गावांत नियोजनबद्ध विकास नाही. यामुळे समस्याग्रस्त ठरलेल्या या गावांसाठीही ही निवडणूक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. १ तारखेला होणाऱ्या मतदानानंतर जनता कोणाच्या बाजूने कौल देते, यावर त्यांचे भवितव्य अधिक अवलंबून आहे.