शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

२५४ कामगारांना मिळणार किमान वेतन

By admin | Updated: May 13, 2017 00:44 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट होऊन दोन वर्षे होत आली, तरी तेथील ग्रामपंचायतींमधील चतुर्थ श्रेणीतील

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेत २७ गावे समाविष्ट होऊन दोन वर्षे होत आली, तरी तेथील ग्रामपंचायतींमधील चतुर्थ श्रेणीतील २५४ कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करून घेतल्यानंतरही तुटपुंजा पगार मिळत होता. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्याची दखल घेत या सर्व कामगारांना तातडीने किमान वेतन सुरू करावे, अशी सूचना केली. त्याची दखल घेत सहायक कामगार आयुक्तांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांना नियमानुसार किमान वेतन देण्याचे लेखी आदेश दिले.त्यासंदर्भात गुरुवारी मुंबईत चव्हाण यांच्या दालनात बैठक झाली. त्या वेळी या कामगारांना मिळणारे सध्याचे वेतन हे तुटपुंजे आहे. वाढत्या महागाईसमोर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे अशक्य आहे, असे चव्हाण यांनी सहायक कामगार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार, त्यांनीही वस्तुस्थितीचा अभ्यास करत केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना कामगार कायद्याच्या अधिकाराचा भंग करू नका, असे खडे बोल सुनावले. तसेच या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत किमान वेतन का मिळाले नाही, असा सवाल करत संबंधितांवर कामगार कायद्याचा भंग केला म्हणून फौजदारी गुन्हे दाखल का करू नये, असा सवाल केला. तसेच कर्मचाऱ्यांना तातडीने किमान वेतन देण्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, असेही लेखी आदेश दिले. तसे पत्र केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन यांना तातडीने पाठवण्यात आले.