शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात अवघ्या १४ वर्षीय मुलाने चोरली मोटारसायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 23:00 IST

मोटारसायकल फिरविण्याच्या हौसेपोटी अवघ्या १४ वर्षीय मुलाने त्याच्याच मालकाची मोटारसायकल चोरल्याचा प्रकार उघड झाला आहे. खब-यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतने असून त्याची रवानगी आता बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कारवाई बालसुधारगृहात केली रवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नौपाडा परिसरातून मोटारसायकलचोरी करणा-या एका चौदावर्षीय मुलाला नौपाडा पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. त्याला भिवंडीतील बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश भिवंडीच्या बालन्यायालयाने दिले आहेत.भास्कर कॉलनी, नौपाडा येथून ७ आॅक्टोबर २०१९ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास एक मोटारसायकल चोरीस गेली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले, पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस हवालदार सुनील अहिरे, पोलीस नाईक संजय चव्हाण, सुनील राठोड, बाळासाहेब पाटील आणि पोलीस शिपाई गोरख राठोड यांनी खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गस्तीदरम्यान या अल्पवयीन मुलाला ९ आॅक्टोबर रोजी पकडले. वाहनांची सफाई करणाºयाची तो छोटीमोठी कामे करीत होता. त्याच मालकाची त्याने मोटारसायकल चोरली होती. केवळ हौस म्हणून मोटारसायकल फिरविली. मात्र, पेट्रोल संपल्यानंतर ती एका ठिकाणी उभी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. चोरीतील ७० हजारांची विनाक्रमांकाची मोटारसायकलही या पथकाने त्याच्या ताब्यातून हस्तगत केली आहे. त्याची भिवंडीच्या बालसुधारगृहात रवानगी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी