शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा टाईमपास त्यांच्यासाठी गेमचेंजर ठरतो; गेम बनविणारा अब्जाधीश होतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 17:15 IST

मोबाईलवर तासंतास गेम खेळण्यामुळे लोक वेडे झाल्याचे पाहिले आहे. कोल्हापुरातच धक्कादायक प्रकार समोर आला होता.

मोबाईलवर तासंतास गेम खेळण्यामुळे लोक वेडे झाल्याचे पाहिले आहे. कोल्हापुरातच धक्कादायक प्रकार समोर आला होता. हे गेम खेळणे म्हणजे आपल्यासाठी वेळ घालवणे असते. मात्र, असाच एक व्यक्ती मोबाईल गेममुळे अब्जाधीश झाला आहे. सिंगापूरच्या गैंग यी यांच्याबाबतीत हा प्रवास आहे. 

गैंग यी हे गेम डेव्हलप करणारी कंपनी सी लिमिटेडचे सह संस्थापक आहेत. त्यांच्या कंपनीचा फ्री फायर हा गेम सध्या खूप लोकप्रिय होत आहे. सलग तिसऱ्या तिमाहीमध्ये सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या पाच गेममध्ये या गेमचे स्थान आहे. यामुळे यी यांचे सहकारी फॉरेस्ट ली यांची संपत्ती आधीच 10 आकड्यांमध्ये पोहोचली आहे. 1990 मध्ये चीनमधून सिंगापूरला यी आले होते. ते 2017 पासून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार कंपनीमध्ये त्यांची 8.4 टक्क्यांची भागीदारी आहे, ज्याचे मूल्य आता 1 अब्ज डॉलर आहे. 

कंपनीचा मोठा व्यवसाय गेमिंगच आहे. यामुळे गुगल प्लेस्टोअरवर जेवढे डाऊनलोड मिळतील तेवढा जास्त फायदा या कंपन्यांना होतो. यामुळे यी यांच्या संपत्तीतही कमालीची वाढ झाली आहे. गेम डाऊनलोड केल्यावर अन्य कंपन्या त्यावर जाहिराती दाखवितात. शिवाय गुगलही प्ले स्टोअरला व्हिजीट वाढल्याने त्याचे पैसे कंपन्यांना देते. अशा प्रकारे लाखो डॉलरचे उत्पन्न या कंपन्यांना जात असते. यामुळे गेम खेळणारे फुकटात वेळ वाया घालवतात पण त्याचा फायदा या कंपन्यांच्या मालकांना होतो. 

यी आणि ली हे गेमिंग सेक्टरमधील नवीन अब्जाधीश आहेत. त्यांच्या आधी फोर्टनाईट मेकर एपिक गेम्सचे निर्माते टीम स्वीनेय स्वीनेय (7.2 अब्ज डॉलर) आणि गाबे न्यूवेल (5.7 अब्ज डॉलर) यांनी कमावले आहेत.

टॅग्स :MobileमोबाइलGame Of Thronesगेम ऑफ थ्रोन्स