दे धमाल! WhatsApp युजर्सची प्रतीक्षा संपली; आता 'वेब'वरूनही करता येणार ग्रुप व्हिडीओ कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:18 IST2026-01-19T12:16:41+5:302026-01-19T12:18:14+5:30

WhatsApp : WhatsApp वर एक नवीन फीचर येत आहे, ज्यानंतर WhatsApp वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध होईल.

WhatsApp web voice and video calls group chats | दे धमाल! WhatsApp युजर्सची प्रतीक्षा संपली; आता 'वेब'वरूनही करता येणार ग्रुप व्हिडीओ कॉल

Getty Image

WhatsApp वर एक नवीन फीचर येत आहे, ज्यानंतर WhatsApp वेब व्हर्जनवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध होईल. आतापर्यंत ग्रुप व्हिडीओ आणि ऑडीओ कॉलसाठी स्मार्टफोन किंवा WhatsApp विंडोज एपचा वापर करावा लागत असे. मात्र आता जर तुम्ही दुसऱ्या कोणाचा लॅपटॉप वापरत असाल, तरी येणाऱ्या काळात WhatsApp वेबच्या माध्यमातून ग्रुप कॉलवर कनेक्ट होऊ शकाल. ही माहिती WAbetainfo ने शेअर केली आहे.

WhatsApp च्या अपकमिंग फीचर्स आणि अपडेट्सचा मागोवा घेणाऱ्या 'WAbetainfo' या वेबसाइटने सांगितलं आहे की, WhatsApp वेब व्हर्जनवर ग्रुप व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल्सचा सपोर्ट मिळणार आहे. सध्या हे फीचर डेव्हलपमेंट स्टेजमध्ये असून अद्याप बीटा व्हर्जनसाठीही जारी करण्यात आलेलं नाही. या अपकमिंग फीचरची झलक दाखवण्यासाठी रिपोर्टमध्ये काही स्क्रीनशॉट्सही शेअर करण्यात आले आहेत.

WhatsApp वेबमध्ये कॉलिंग आयकॉन उपलब्ध 

सध्या WhatsApp वेबच्या ग्रुप चॅटमध्ये वरच्या बाजूला व्हिडीओ कॉलचा आयकॉन दिसतो. मात्र त्यावर क्लिक केल्यास 'विंडोज एपद्वारे ग्रुप कॉल करा' असा मेसेज दिसतो. येणाऱ्या काळात विंडोज पशिवाय थेट वेब ब्राउझरवरून ग्रुप व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल्स करणं शक्य होईल.

WhatsApp वेबवरून केल्या जाणाऱ्या ग्रुप कॉल्सवर सुरुवातीला काही मर्यादा असू शकतात. WhatsApp ने अद्याप या मर्यादांबाबत अधिकृतपणे काहीही स्पष्ट केलेलं नाही. येणाऱ्या काळात हे स्पष्ट होईल की, वेबवरील ग्रुप कॉल्समध्ये स्टँडर्ड व्हिडीओ सपोर्ट मिळेल की एचडी (HD) व्हिडीओ सपोर्ट.

कव्हर फोटोवर नवीन प्रायव्हसी फीचर्स 

WAbetainfo ने याआधी माहिती दिली होती की, बीटा व्हर्जनमध्ये कव्हर फोटोसाठी नवीन प्रायव्हसी कंट्रोल्स देण्यात आले आहेत. हे कंट्रोल्स सध्या iOS (आयफोन) युजर्ससाठी जारी करण्यात आले असून, याद्वारे युजर्स आपला कव्हर फोटो कोणाला दिसावा हे स्वतः ठरवू शकतील.

Web Title : WhatsApp वेब पर जल्द ही ग्रुप वॉयस और वीडियो कॉल सपोर्ट!

Web Summary : WhatsApp वेब जल्द ही ग्रुप वॉयस और वीडियो कॉल को सपोर्ट करेगा। वर्तमान में विकास के अधीन, यह सुविधा उपयोगकर्ताओं को वेब ब्राउज़र के माध्यम से कनेक्ट करने की अनुमति देगी, जिससे ऐप की आवश्यकता समाप्त हो जाएगी। कवर फ़ोटो के लिए गोपनीयता नियंत्रण भी iOS पर आ रहे हैं।

Web Title : WhatsApp Web to Support Group Voice and Video Calls Soon!

Web Summary : WhatsApp Web will soon support group voice and video calls. Currently in development, this feature will allow users to connect via web browsers, eliminating the need for the app. Privacy controls for cover photos are also coming to iOS.